Advertisement

संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी जाणार...

संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे.

संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी जाणार...
SHARES

काही दिवसांपूर्वी अभिनेता संजय दत्तला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. पण आता मुंबई लाइव्हच्या विश्वसनीय सुत्रांनी माहिती दिली की, संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे.

८ ऑगस्टला संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल केलं होतं. लीलावती रुग्णालयात दाखल करताच त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. परंतु चाचणी नेगेटिव्ह आली. त्यानंतर त्याच्या इतर चाचण्या करण्यात आल्या. त्यातून त्याला कर्करोगाचं निदान करण्यात आलं. संजय दत्तवर पुढे अमेरिकेत उपचार होणार आहेत.

सध्या तरी दत्त कुटुंबियांकडून या संदर्भात कुठलीच पुष्टी केली गेली नाही. पण मुंबई लाइव्हला विश्वसनीय सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. 

पण संजय दत्तनं नुकतीच चित्रपटांमधून ब्रेकची घोषणा केली. त्यानं सोशल मीडियावर लिहिलं की, "मित्रांनो, मी काही वैद्यकीय उपचारासाठी कामातून थोडासा ब्रेक घेत आहे. माझे कुटुंब आणि मित्र माझ्याबरोबर आहेत आणि मी माझ्या हितचिंतकांना काळजी करू नका असं आवाहन करतो.  तुमच्या प्रेमामुळे आणि शुभेच्छांमुळे, मी लवकरच परत येईन. "

संजय दत्तची पत्नी मान्यता आणि मुले दुबईत आहेत. तो देखील मुंबईत आला होता. त्यानं आपला ६१ वा वाढदिवस कुटुंबापासून दूर मुंबईत साजरा केला. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत’ या चित्रपटात तो अखेरच्या वेळी दिसला होता आणि लवकरच आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि इतरांसोबत सडक २ मध्ये दिसणार आहे.

२०२० हे वर्ष बॉलिवूडसाठी वाईट सिद्ध होत आहे. अनेक बड्या सेलिब्रिटिंनी २०२० या वर्षात जगाचा निरोप घेतला. आता संजय दत्त याला कर्करोग झाल्याचं समोर आलं आहे. या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांना आणि बॉलिवूड विश्वाला देखील धक्का बसला आहे.    




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा