Advertisement

संजय दत्तच्या आजाराबद्दल पत्नी मान्यताचं निवेदन, चाहत्यांना केलं 'हे' आवाहन

संजय दत्तच्या आजारपणाची बातमी मंगळवारी रात्री समोर आल्यानंतर चाहते आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला.

संजय दत्तच्या आजाराबद्दल पत्नी मान्यताचं निवेदन, चाहत्यांना केलं 'हे' आवाहन
SHARES

अभिनेता संजय दत्तचा फुफ्फुसांच्या कर्करोग अॅडव्हान्स स्टेजमध्ये असल्याचं सोमर आलं आहे. संजय दत्तची पत्नी मान्यतानं एक निवेदन जारी केलं आहे. ज्यामध्ये तिनं संजूच्या चाहत्यांना प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. सोबतच तिनं यात संजयच्या आजारपणाबाबत काहीही सांगितलेलं नाही. मात्र संजयचा एका फायटर म्हणून उल्लेख केला आहे.

मान्यतानं एक निवेदन जारी केलं आहे. ज्यामध्ये ती म्हणाली की, “संजूच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची आवश्यकता आहे. या कुटुंबानं यापूर्वी खूप काही सहन केलं आहे. परंतु मला खात्री आहे की ही वेळ देखील निघून जाईल. आपणा सर्वांना माझी विनंती आहे की, संजूच्या चाहत्यांच्या कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये.

आम्हाला मदत करा आणि आपले प्रेम असेच कायम ठेवा. संजू कायमच लढाऊ वृत्तीचा आहे. आणि म्हणून आमचे कुटुंब प्रत्येक कठीण प्रसंगाला धैर्यानं सामोरं गेले आहे. हे आव्हान देऊन भगवंताने पुन्हा एकदा आमची परीक्षा घेतली आहे. आम्हाला आपले प्रेम आणि आशीर्वादांची गरज आहे. आम्हाला माहित आहे की यावेळी देखील आम्ही विजय मिळवू. सकारात्मकतेचा प्रसार करण्यासाठी या वेळेचा सदुपयोग करा.

संजय दत्तच्या आजारपणाची बातमी मंगळवारी रात्री समोर आल्यानंतर चाहते आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. संजय दत्तची पत्नी मान्यता लॉकडाऊनपासून दोन्ही मुलांसोबत दुबईत अडकली होती. पण त्याच्या आजापणाचे कळताच ती मंगळवारी रात्री मुंबईत पोहोचली आहे.



हेही वाचा

दिग्दर्शक निशीकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक

प्रसिद्ध गझलकार राहत इंदौरी कालवश, ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ मुळे चर्चेत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा