Advertisement

दिग्दर्शक निशीकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक

मराठी सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर लय भारीचे दिग्दर्शक निशीकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक आहे.

दिग्दर्शक निशीकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक
SHARES

मराठी सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर लय भारीचे दिग्दर्शक निशीकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक आहे. यकृताच्या गंभीर आजारामुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना पुढील उपचारासाठी हैदराबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

निशीकांत कामत यांना डोंबीवली फास्ट, लय भारी आणि सातच्या आत घरात या मराठी चित्रपटांसह दृश्यम, फोर्स, फोर्स, रॉकी हँडसम आणि मदारी या चित्रपटांचं दिग्दर्शक म्हणून ओळखलं जातं.

हेही वाचा : मला न्यूझीलंडला जाऊन राहायचंय, केदार शिंदेच्या वक्तव्यावर ट्रोलर्स नाखूश

डोंबिवली फास्ट या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सुपरहिट ठरलला होता. यानंतर मुंबई साखळी बॉम्बस्फोटावर आधारित ‘मुंबई मेरी जान’ या हिंदी चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. यानंतर त्यांना दृश्यम, मदारी, फुगे अशा चित्रपटांच्या ऑफर त्यांना मिळाल्या.

जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम या चित्रपटात त्यांना व्हिलेनची भूमिका साकारली होती. त्यांनी अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत भावेश जोशी या चित्रपटात देखील काम केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निशीकांत सध्या आपला आगामी चित्रपट दरबारसाठी काम करत होते. त्यांचा हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज होऊ शकतो.हेही वाचा

संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी जाणार...

स्वरा भास्करचा रीया चक्रवर्तीला पाठिंबा, नेटिझन्सनी केलं ट्रोल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा