Advertisement

मला न्यूझीलंडला जाऊन राहायचंय, केदार शिंदेच्या वक्तव्यावर ट्रोलर्स नाखूश

मला न्यूझीलंडला जाऊन रहायचंय. कसं शक्य माहिती नाही. या १०० दिवसात तिथं एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळलेला नाही, असं म्हणत प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक केदार शिंदे यांनी केंद्र सरकारवर तिरकस टीका केली आहे.

मला न्यूझीलंडला जाऊन राहायचंय, केदार शिंदेच्या वक्तव्यावर ट्रोलर्स नाखूश
SHARES

मला न्यूझीलंडला जाऊन रहायचंय. कसं शक्य माहिती नाही. या १०० दिवसात तिथं एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळलेला नाही, असं म्हणत प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक केदार शिंदे यांनी केंद्र सरकारवर तिरकस टीका केली आहे. एवढंच नाही, तर या वक्तव्यावर सोशल मीडियावरुन ट्रोलिंग करणाऱ्यांनाही त्यांनी तिखट शब्दांत खडसावलं आहे. (director kedar shinde criticised modi government over corona pandemic in india)

भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नसून सद्यस्थितीत देशात साडेबावीस लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४५ हजारांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या तुलनेत इतर पाश्चिमात्य देश मात्र कोरोना संकटावर हळुहळू नियंत्रण मिळवतानाच दिसत आहे. हाच धागा पकडून केदार शिंदे यांनी यांनी देशातील बिघडत चाललेल्या कोरोनाच्या स्थितीवर भाष्य केलं.

केदार शिंदे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून म्हटलं की, मला न्यूझीलंड इथं जाऊन रहायचयं. कसं शक्य माहीत नाही. या १०० दिवसात तिथं एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळलेला नाही. महिला पंतप्रधान आहे. देवी तिथं जागृत आहे. आम्ही इथं फक्त बेटी पढाव बेटी जगाव चे फतवेच काढणार!!!

हेही वाचा - धारावीत १० दिवसांत एकही मृत्यू नाही

न्यूझीलंडमध्ये १ मे रोजी लाॅकडाऊन शिथिल करण्यात आलं होतं. तेव्हापासून तिथं मागील १०० दिवसांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अॅर्डन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य यंत्रणांनी उत्तम कामगिरी करत जगापुढे मोठा आदर्श ठेवल्याचं केदार शिंदे यांचं म्हणणं आहे. 

केदार शिंदे यांनी हे ट्विट करताच ट्रोलर्सनी त्यांना घेरण्यास सुरूवात केली. त्यांनाही केदार शिंदे यांनी सणसणीत उत्तर दिलं. काही लोकांच्या मेंदूचा chemical लोच्या झालाय. Sarcasm, तिरकसपणा या विषयी काहीच माहिती नसावी. एखादी पोस्ट टाकली की उत्तरादाखल हे बुध्दीचं प्रदर्शन मांडणार. एक मोबाईल, आईबापाने भरलेला free data, भक्तीची डोळ्यावर पट्टी बांधून यांची मोबाईलवर बोटं फिरतात! #कृष्ण जन्मून मर्दन करावं आता!

असं म्हणत केदार शिंदे यांनी अंध भक्तांनाही तिरकस शैलीत चपराक दिली आहे.

हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे ९२५ नवे रुग्ण, ४६ जणांचा दिवसभरात मृत्यू

संबंधित विषय
Advertisement