Advertisement

धारावीत १० दिवसांत एकही मृत्यू नाही

मुंबईत सुरूवातीपासून धारावी कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनला होता. मात्र, त्यानंतर धारावीत कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात यश आलं आहे.

धारावीत १० दिवसांत एकही मृत्यू नाही
SHARES

मुंबईत सुरूवातीपासून धारावी कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनला होता. मात्र, त्यानंतर धारावीत कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात यश आलं आहे. रोज रुग्ण सापडण्याचं प्रमाणही घटलं आहे. त्याचबरोबर धारावीतील मृत्यूचं प्रमाणही घटलं आहे.

जुलैपासून कोरोना रुग्णांचे मृत्यू होण्याचं प्रमाणही घटलं आहे. ऑगस्टच्या १० दिवसांत येथे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. माहीममध्ये प्राणवायूसह उपलब्ध केलेल्या खाटांच्या सुविधेमुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

 धारावीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण १ एप्रिल रोजी सापडला आणि त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी, खासगी डॉक्टर आणि पालिकेच्या दवाखान्यांमध्ये सुरू केलेली तपासणी, मोबाइल दवाखाने, तपासणी शिबीर आदी विविध उपाययोजनांमुळे धारावीमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आली.

धारावीमध्ये आतापर्यंत २६१७ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २२७१ रुग्ण बरे झाले आहेत. तर २५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील ६७ रुग्णांचा मृत्यू एप्रिलमध्ये तर मे महिन्यात १५४ रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र निसर्ग उद्यानासमोर जूनमध्ये करोना आरोग्य केंद्र उभारल्यानंतर मृत्यूचे प्रमाण घसरू लागले. जूनमध्ये ३१ जणांचा, तर जुलैमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला. तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत धारावीतील एकही रुग्ण दगावलेला नाही. सध्या धारावीमध्ये ८८ सक्रिय रुग्ण आहेत.हेही वाचा

कल्याण डोंबिवलीमध्ये २०१ नवे रुग्ण

ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ


Read this story in हिंदी
संबंधित विषय