Advertisement

कल्याण डोंबिवलीमध्ये २०१ नवे रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी कोरोनाचे २०१ नवीन रुग्ण आढळले. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये २०१ नवे रुग्ण
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी कोरोनाचे २०१ नवीन रुग्ण आढळले. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २२,६५३ झाली आहे. 

५३१ रुग्णांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत  १७,८७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सध्या येथे ४३२९  रुग्ण उपचार घेत आहेत.  आतापर्यत ४४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन २०१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व २९,  कल्याण पश्चिम ४३,  डोंबिवली पूर्व ७८, डोंबिवली पश्चिम ३५, मांडा टिटवाळा ९,  तर मोहना येथील  ७ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १५४ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून,  ८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, २ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून, २ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून, ६ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.



हेही वाचा

धारावी नियंत्रणात, दादर, माहीममध्ये रुग्णवाढ कायम

मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ८९ दिवसांवर




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा