Advertisement

मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ८९ दिवसांवर

मुंबईतील एकूण रुग्णसंख्या आता १ लाख २२ हजार ३३१ झाली आहे. यामधील ९५ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ८९ दिवसांवर
SHARES

मुंबईमधील कोरोना आता नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८९ दिवसांवर पोहोचला आहे. शनिवारी १३०४ नवीन कोरोना रुग्ण मुंबईत आढळले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या आता १ लाख २२ हजार ३३१ झाली आहे. यामधील ९५ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे मुंबईत ७७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ६७४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १९ हजार ९३२ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.  मुंबईतील रुग्णवाढीचा दर एक टक्क्यांपेक्षा कमी ०.८२ टक्के आहे. बोरिवली, नानाचौक-ग्रँटरोड, मस्जिद बंदर, डोंगरी या परिसरात मुंबईतील सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. या भागात रुग्णवाढीचा दर १.३ टक्के आहे.

मुंबईतील सील इमारती व प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. पालिकेने १ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या यादीत ५५१९ सील इमारतींचा, तर ६१७ प्रतिबंधित क्षेत्रांचा समावेश होता. तर ६ ऑगस्टच्या यादीनुसार,५४८४ सील इमारती असून ६०८ ठिकाणे प्रतिबंधित आहेत. त्यातील ३५ इमारती, तर ९ प्रतिबंधित क्षेत्रे वगळण्यात आली आहेत. बोरिवली परिसरात सर्वाधिक  ७०८ इमारती सील केल्या आहेत. अंधेरी पूर्व परिसरात ४९३, कांदिवलीमध्ये ४३१, मुलुंडमध्ये ३५२, दहिसरमध्ये ३२७, अंधेरी पश्चिममध्ये २८०, तर ग्रॅन्टरोड  व परिसरात  २६० इमारती सील आहेत हेही वाचा-

मुंबईत कोरोनाचे १३०४ नवे रुग्ण, ५८ जणांचा दिवसभरात मृत्यू
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा