Advertisement

'या' कारणांमुळे घाटकोपर ठरतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

मुंबईत वरळी, धारावी, मालाड नंतर आता घाटकोपर हे कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट तयार झाले आहे. घाटकोपरमध्ये मृत्यूदर सर्वाधिक म्हणजेच ९ टक्के असून तो एकूणच शहराच्या दुप्पट आहे.

'या' कारणांमुळे घाटकोपर ठरतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट
SHARES

मुंबईतील घाटकोपर हा परिसर सध्या कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. या ठिकाणी कोरोनामुळे आतापर्यंत ५७५  जणांचा बळी गेल्याचे पुढे आले आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ६६४५ जणांचा शहरात शनिवारपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये ‘एन वॉर्ड’चा नंबर हा प्रथम आहे. तर त्या खालोखाल ‘के वॉर्ड’ (पूर्व विले पार्ले-अंधेरी-जोगेश्वरी) येथे एकूण ४६० जणांचा बळी गेला आहे. त्यानंतर ‘जी नॉर्थ वॉर्ड’ (धारावी-दादर-माहिम) येथे यापूर्वी कोरोनाची भयंकर परिस्थिती होती. परंतु आता हे परिसर तिसऱ्या क्रमांकावर असून येथे ४२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे महापालिकेने जाहिर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचाः- अरे बापरे ! राज्यात १२ हजार ८२२ नवे रुग्ण, २७५ जणांचा दिवसभरात मृत्यू

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव हा नियंत्रण आणण्यात जरी पालिकेला यश आले असले. तरी कोरोनाचे नवनवीन बनत असलेले हॉटस्पॉट पालिकेची डोकेदुखी ठरत आहेत. मुंबईत वरळी, धारावी, मालाड नंतर आता घाटकोपर हे कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट तयार झाले आहे. घाटकोपरमध्ये मृत्यूदर सर्वाधिक म्हणजेच ९ टक्के असून तो एकूणच शहराच्या दुप्पट आहे. त्याचसोबत कोरोनाच्या रुग्णांबाबत बोलायचे झाल्यास घाटकोपर हा सहाव्या क्रमांकावर असून येथे मार्च पासून ६२६३ रुग्ण आढळून आले आहेत. तर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, घाटकोपर मधील बळींचा आकडा सर्वाधिक आहे. त्याचसोबत यापूर्वी झालेल्या मृतांचा आकडा सुद्धा नव्या बळींच्या आकडेवारीत म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या आकडेवारीत दाखवला जाणार आहे. त्यामुळे एकूण महिन्याभारत किती जणांचा बळी गेला हे समजून येणार आहे

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे १३०४ नवे रुग्ण, ५८ जणांचा दिवसभरात मृत्यू

दरम्यान, घाटकोपरमधील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार बहुतांश कोरोनाचे रुग्ण हे इमारतीत राहणारे आहेत. परंतु कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढेल म्हणून महापालिकेकडून अधिक नागरिकांची चाचणीच करण्यात येत नाही आहे. त्यावर महापालिकेकडून ‘स्थानिक राजकीय नेत्यांनी इमारतीमधील नागरिकांची कोरोनाची चाचणी करण्यात यावी अशी विनंती केली. परंतु याबाबद्दल आम्ही आधीच विचार केला होता. यामध्ये बहुतांश नागरिकांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यामधील काहींना अन्य आजार असल्याचे ही दिसून आले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा