Advertisement

वांद्र्यातील अस्वच्छ रेल्वे मार्गाबाबत पश्चिम रेल्वेची कारवाई

पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 28 फेब्रुवारीपासून या भागाची रेकी करणे आणि धातूचे बॅरिकेड्स बसवणे सुरू झाले.

वांद्र्यातील अस्वच्छ रेल्वे मार्गाबाबत पश्चिम रेल्वेची कारवाई
SHARES

पश्चिम रेल्वेकडून (western railway) वांद्रे रेल्वे (bandra) स्थानकाच्या पूर्वेकडील ट्रॅकच्या अखेर कुंपण (barricades) घालण्यात येत आहे.

गेल्या काही दशकांपासून, झोपडपट्टीवासी नियमितपणे रेल्वे रुळांवर आणि बाजूने कचरा आणि घाण टाकत आहेत, ज्यामुळे आरोग्यासाठी धोका निर्माण होण्यासोबतच रेल्वेच्या पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले 

पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 28 फेब्रुवारीपासून या भागाची रेकी करणे आणि धातूचे बॅरिकेड्स बसवणे सुरू झाले.

गेल्या दोन दिवसांत, रेल्वे अभियंत्यांनी तीन मीटर उंच कुंपणासाठी सर्व्हे करण्याचे प्राथमिक काम पूर्ण केले.

पायाच्या खांबांसाठी खड्डे सध्या खोदले जात आहेत. 50 पैकी 48 खड्ड्यांवर खोदकाम पूर्ण झाले आहे आणि 33 खड्ड्यांमध्ये पायाची भरणी करण्यात आली आहे.

“वांद्रे पूर्व येथे हार्बर लाईनच्या समांतर 150 मीटरच्या पट्ट्यावर कुंपण बसवले जात आहे,” असे पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. “तसेच आम्ही 37 मीटरचे काम पूर्ण केले आहे.” असेही ते पुढे म्हणाले.

वांद्रे स्थानकाच्या पूर्वेकडील झोपडपट्ट्या दीर्घकाळापासून तेथे जम बसवून आहेत. येथील रहिवाशी लगतच्या रुळांवर मोठ्या प्रमाणात कचरा फेकतात. इतकंच नाही तर काही रहिवासी तेथे शौच करण्यास बसतात.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि इतरांसाठी आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या (unclean) दृष्टीने फार धोकादायक आहे.

विशेषतः हार्बर मार्गावर (harbour)  रेल्वे त्यांना हटवण्यासाठी धडपडत आहे परंतु झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे लोक राजकीय पक्षांसाठी मतपेढी असल्याने रेल्वे प्रशासन नेहमीच राजकीय अडथळ्यांमुळे अपयशी ठरले आहे. असे सूत्रांनी सांगितले.

एका परदेशी पर्यटकाने सोशल मीडियावर ट्रॅकची स्थिती पोस्ट केल्यानंतर अधिकाऱ्यांनी हे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला.

झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे लोक त्यांचे कपडे रुळांवर वाळवतात किंवा फर्निचर धोकादायक पद्धतीने पाचव्या रेल्वे मार्गाजवळ ठेवतात ज्यावर लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकोमोटिव्ह धावतात.

रुळांवर टाकलेला कचरा काँक्रीट स्लीपरच्या खाली साचतो, ज्यामुळे सार्वजनिक पायाभूत सुविधांचे नुकसान होते. पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या वर्षीच रुळांवरून सुमारे 600 घनमीटर कचरा काढण्यात आला.

अलिकडेच पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी कचऱ्यामुळे खराब झालेले काँक्रीट स्लीपर देखील 8 ते 10 कोटी रुपये खर्चून बदलले. रेल्वे मालमत्तेचे आयुष्य वाढवण्यासाठी स्लीपर बदलण्यात आले, परंतु झोपडपट्टीवासीयांनी ट्रॅकवर टाकलेल्या घाणीमुळे त्यांची देखभाल करणे कठीण आहे.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा