कल्याण-डोंबिवली (KDMC)मध्ये कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आता हे क्षेत्र कोरोनाचे एक नवीन हॉटस्पॉट (COVID 19 Hotspot) म्हणून उदयास येत आहे. कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या इतक्या झपाट्यानं वाढत आहे की हा भाग ठाण्यालाही मागे टाकत आहे.
ठाण्यात आतापर्यंत एकूण १४ हजार ११४ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ५ हजार ६०८ अक्टीव्ह रुग्ण आहेत. मंगळवारी कल्याण-डोंबिवली (KDMC)मध्ये एकूण २०७ रुग्णांनी आपला प्राण गमावला. तर ६ हजार ४३३ अक्टीव्ह रुग्ण आहेत.
आश्चर्य म्हणजे कल्याण-डोंबिवलीत मेच्या सुरूवातीच्या काळात बर्याच कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण होते. परंतु नंतरच्या काळात ज्याप्रकारे कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत ती अत्यंत चिंताजनक बाब आहे. अलीकडच्या काळात कल्याण-डोंबिवलीत वाढती रुग्ण संख्या पाहून हा भाग कोरोना हॉटस्पॉट होतोय की काय अशी भिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४९८ नवे रुग्ण
स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या वाढत्या घटनेसाठी KDMCला जबाबदार धरलं आहे. ते म्हणतात की, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC)नं या प्राणघातक विषाणूविरूद्ध लढण्यासाठी ज्याप्रकारे तयारी केली आहे ती पुरेशी नाही.
केडीएमसी ही परिस्थिती हाताळू शकत नसल्याचंही रहिवाश्यांनी नमूद केलं आहे. तर केडीएमसीकडे २ हजार ०४७ आरोग्य केंद्रे होती. तर कोरोना रुग्णांसाठी ४ हजार ४७२ कोविड -19 बेड्स होते. तसंच 2 जुलैपर्यंत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतरही कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी तब्बल ४९८ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १४ हजारांच्या वर गेली आहे.
दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी ६२७ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकूण रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ७४ झाली आहे. यामधील ६२९५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर ७५६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यत २१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा