Advertisement

दादर, माहीममध्ये चिंता वाढली

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी, धारावीतील कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. मात्र, दादर आणि माहीममधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

दादर, माहीममध्ये चिंता वाढली
SHARES

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी, धारावीतील कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. मात्र, दादर आणि माहीममधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे येथील चिंता वाढत चालली आहे. 


दादरमध्ये बुधवारी ५९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील एकूण रुग्णसंख्या १२७७  झाली आहे. तर माहिममध्ये १७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून येथील रुग्णसंख्या १४२० वर गेली. आहे. दादरमध्ये ३८६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दादरमध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन स्क्रिनिंग कॅम्प सुरु केल्याने रूग्णसंख्या वाढत असल्याचं पालिकेने स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी धारावीमध्ये केवळ एक कोरोना रुग्ण आढळला होता. मात्र बुधवारी धारावीत एका दिवसांत २३ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. 

मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. मुंबईतील कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत गेलं आहे. तर मुंबईच्या २४ विभागांपैकी १७ विभागातील कोरोना रुग्णावाढीचा वेग आता दीड टक्क्याच्या खाली आला आहे. यापैकी काही विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर एक टक्क्याच्याही खाली आहे. सध्याच्या घडीला या १७ विभागांमध्ये १.३४ टक्क्याच्या सरासरीने रुग्ण वाढत आहेत. तर उर्वरित सात विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर २.५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. 



हेही वाचा -

धारावी कोरोनामुक्तीकडे, अवघे 'इतके' आहेत अ‍ॅक्टिव रुग्ण

शंभरीतील आजोबांची कोरोनावर मात, रुग्णालयातच केला १०१ वा वाढदिवस साजरा




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा