Advertisement

शंभरीतील आजोबांची कोरोनावर मात, रुग्णालयातच केला १०१ वा वाढदिवस साजरा

आजोबांचं वय लक्षात घेता रुग्‍णालयातील डॉक्‍टरांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांची चांगली काळजी घेतली. आजोबांनीही उपचारांना अतिशय चांगला प्रतिसाद देत कोरोनावर मात केली.

शंभरीतील आजोबांची कोरोनावर मात, रुग्णालयातच केला १०१ वा वाढदिवस साजरा
SHARES

मुंबईतील एका १०० वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. जोगेश्‍वरी पूर्वमधील महापालिकेच्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्‍णालयात अर्जुन गोविंद नारिंग्रेकर या आजोबांनी न्युमोनिया आणि कोरोनाशी यशस्‍वी लढा दिला. विशेष म्हणजे १५ जुलैला त्यांनी १०१ व्‍या वर्षात पदार्पण केलं. डिस्चार्ज देण्यापूर्वी रुग्णालयातच त्यांचा १०१ वा वाढदिवसही साजरा करण्यात आला.


कांदिवलीत राहणारे नारिंग्रेकर आजोबा पूर्वाश्रमीचे शिक्षक आहेत. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर १ जुलैला त्यांना जोगेश्वरी येथील महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  यावेळी त्यांना न्युमोनिया झाल्याचंही आढळून आलं. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. 


आजोबांचं वय लक्षात घेता रुग्‍णालयातील डॉक्‍टरांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांची चांगली काळजी घेतली. आजोबांनीही उपचारांना अतिशय चांगला प्रतिसाद देत कोरोनावर मात केली. त्यांच्यावर रुग्णालयात १४ दिवस उपचार करण्यात आले. १५ जुलैला १०१ व्‍या वर्षात पदार्पण करत असलेल्‍या आजोबांना मंगळवारी रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्‍यात आला. मात्र, डिस्चार्जपूर्वी डॉक्टरांनी या शंभरी पार केलेल्या आजोबांचा रुग्णालयातच केक आणून वाढदिवस केला. आजोबांनीही आपल्या खणखणीत आवाजात या सर्वांचं आभार मानलं.



हेही वाचा -  

मुंबईत पुढील ४८ तासांत २०० मिमी पावसाचा अंदाज

ऑगस्टमध्ये उपनगरी रेल्वेगाड्या सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार - अस्लम शेख




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा