Advertisement

मुंबईत पुढील ४८ तासांत २०० मिमी पावसाचा अंदाज


मुंबईत पुढील ४८ तासांत २०० मिमी पावसाचा अंदाज
SHARES

मुंबईत मंगळवारी सकाळपासून सुरु झालेल्या पावसाने नॉन-स्टॉप हजेरी लावली आहे. बुधवारी देखील पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईच्या सखल भागात पाणी सचण्याची शक्यता असून, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत मागील २४ तासांत मुसळधार पावसाची सांताक्रूझ इथं ९७ मिमी आणि कुलाबा इथं १२२ मिमी नोंद झाली आहे. तसंच, पुढील ४८ तासांत २०० मिमी पावसाची नोंद होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूकीला ब्रेक लागला आहे.

मुंबईच्या सखल भागात गुडघाभर पाणी तुंबत असल्यानं वाहतूक कोंडीची परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. त्याशिवाय, पाणी साचण्याच्या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप लावले आहेत.



हेही वाचा -

Jio 5G: पुढच्या वर्षी येणार जिओचं ५ जी नेटवर्क- मुकेश अंबानी

‘या’ परिसरात साचलं पाणी, पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ते केले बंद



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा