Advertisement

LPG टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात

इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टंचाई झपाट्याने वाढत आहे.

LPG टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात
SHARES

मध्यपूर्व आशियाने तणावाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने मुंबईतील (mumbai) हॉटेल आणि रेस्टॉरंट (restaurant) उद्योगावर परिणाम होत आहे.

गॅसचा पुरवठा तातडीने सुरळीत झाला नाही तर काही दिवसांत शहरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी दिला आहे.

इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टंचाई झपाट्याने वाढत आहे.

"आजच्या घडीला आमच्या सुमारे 10 ते 20 टक्के सदस्यांना गॅस (gas cylinder) मिळण्यात अडचणी येत आहेत. उद्यापर्यंत हा आकडा 60 टक्क्यांपर्यंत जाईल. परवापर्यंत जवळपास 100 टक्के रेस्टॉरंट्सवर परिणाम होईल आणि त्यांना बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते,” असे शेट्टी यांनी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

या समस्येबाबत असोसिएशनने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशीही संपर्क साधण्यात आला आहे.

तसेच गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुलुंडमधील ‘हॉटेल सागर’चे संचालक अन्नू शेट्टी यांनी सांगितले की, व्यावसायिक एलपीजी सिलिंडर मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. "काही ठिकाणी सिलिंडर उपलब्ध असले तरी 1,750 रुपयांचा सिलिंडर सुमारे 1,950 रुपयांना विकला जात आहे," असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. एका बुकिंगनंतर सिलिंडर मिळण्यासाठी दोन ते आठ दिवसांचा प्रतीक्षा कालावधी लागत असल्याची माहिती डिलर्सनी दिली.

ही टंचाई कायम राहिल्यास काही व्यावसायिक ग्राहक अनुदानित घरगुती सिलिंडर काळ्या बाजारातून खरेदी करण्याचा मार्ग स्वीकारू शकतात, अशी भीती उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या मते ही पद्धत बेकायदेशीर आणि धोकादायक आहे.

एलपीजी पुरवठ्याचा हा प्रश्न केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून बंगळुरूमध्येही (bengaluru) हॉटेल असोसिएशनने हॉटेल्स बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

गॅसचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर 10 मार्चपासून हॉटेल्स बंद ठेवावी लागतील, असे असोसिएशनचे मानद अध्यक्ष पी. सी. राव यांनी सांगितले.



हेही वाचा

रेल्वे प्रशासनाने रेल नीरच्या विक्रीवर आळा घातला

मुंबईतील नद्यांच्या प्रदूषणावर उपाययोजना करण्याचे आदेश

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा