Advertisement

Jio 5G: पुढच्या वर्षी येणार जिओचं ५ जी नेटवर्क- मुकेश अंबानी

रिलायन्स जिओ संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान असलेलं ५ जी नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाँच करणार आहे.

Jio 5G: पुढच्या वर्षी येणार जिओचं ५ जी नेटवर्क- मुकेश अंबानी
SHARES
रिलायन्स जिओ संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान असलेलं ५ जी नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाँच करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण बुधवारी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा यावर्षी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या ५ जी तंत्रज्ञानाचं लवकरच ट्रायल सुरु करणार असल्याचं सांगितलं.


अंबानी यावेळी म्हणाले की, ५ जी नेटवर्कसाठी आवश्यक परवाने देण्यास सुरूवात झाल्यानंतर पुढील वर्षी भारतामध्ये हे तंत्रज्ञान लाँच केलं जाईल. हे तंत्रज्ञान जगामध्ये निर्यात करण्याक्षम असेल.  मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा दाखला यावेळी दिला. जिओ याच दिशेने वाटचाल करत असून संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा केवळ वापरच नाही तर जगाला डिजिटल तंत्रज्ञान निर्यात करण्याचे उद्दिष्ट्य ठेवल्याचंही यावेळी अंबांनी यांनी सांगितलं. जिओचं तंत्रज्ञान शून्यापासून निर्माण केलेलं असून १०० टक्के भारतीय आहे. जिओ आता शून्य कर्ज असलेली कंपनी असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.  

जिओमध्ये गुगलची ३३,७३७ कोटींची गुंतवणूक

 मुकेश अंबानी यांनी यावेळी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये आघाडीची टेक कंपनी गुगल मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुगल ३३,७३७ कोटी रुपये गुंतवणार आहे. या गुंतवणूकीद्वारे गुगल कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये ७.७ टक्क्यांची हिस्सेदारी घेईल.

या गुंतवणूकीबाबत गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी ट्विटरद्वारे म्हटलं की, प्रत्येकापर्यंत इंटरनेट पोहोचायला हवं, जिओसोबत भागीदारी केल्यामुळे जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचता येईल याचा आनंद वाटतोय.



हेही वाचा -

मारुती सुझुकीनं परत मागवल्या १.३४ लाख कार, 'हे' आहे कारण




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा