Advertisement

मारुती सुझुकीनं परत मागवल्या १.३४ लाख कार, 'हे' आहे कारण

मारुती सुझुकी या आघाडीच्या कार निर्माता कंपनीने १.३४ लाखांहून अधिक कार परत मागवल्या आहेत.

मारुती सुझुकीनं परत मागवल्या १.३४ लाख कार, 'हे' आहे कारण
SHARES

 मारुती सुझुकी या आघाडीच्या कार निर्माता कंपनीने १.३४ लाखांहून अधिक कार परत  मागवल्या आहेत. कंपनीने माघारी मागवलेल्या कारमध्ये वॅगनआर आणि बलेनो कार आहेत. वॅगनआर आणि बलेनोच्या फ्युअल पंपमध्ये दोष असल्यामुळे त्या कार परत मागवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. 

एक लिटर पेट्रोल इंजिन वॅगनआरच्या ५६ हजार ६६३ कार  कंपनीने परत मागवल्या आहेत. या  कार्सचं उत्पादन १५ नोव्हेंबर २०१८ ते १५ ऑक्टोबर २०१९  या दरम्यान करण्यात आलं आहे. तर कंपनीने ७८ हजार २२२ बॅलेनो कार माघारी घेतल्या आहेत. या बॅलेनो कार ८ जानेवारी २०१९ ते ४ नोव्हेंबर २०१९ दरम्यान उत्पादित केल्या आहेत. 

फ्युअल पंपमधील दुरूस्तीसाठी या कार माघारी घेण्यात  आल्या आहेत. यासाठी कंपनीने डिलर्सना ग्राहकांशी संपर्क करण्यास सांगितलं आहे. फ्युअल पंपमध्ये दोष असल्यास तो दूर करुन ग्राहकांना गाड्या परत केल्या जाणार आहेत. यासाठी ग्राहकांकाडून पैसे आकारले जाणार नसल्याचं कंपनीने सांगितलं आहे. 



हेही वाचा -  

मुंबईत पुढील ४८ तासांत २०० मिमी पावसाचा अंदाज

ऑगस्टमध्ये उपनगरी रेल्वेगाड्या सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार - अस्लम शेख




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा