Advertisement

नवी मुंबई मेट्रोचा मोठा विस्तार

या दोन्ही प्रकल्पांचा अंदाजे खर्च 5,557 कोटी आहे.

नवी मुंबई मेट्रोचा मोठा विस्तार
SHARES

नवी मुंबईतील मेट्रो नेटवर्कच्या विस्ताराचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता आहे. मेट्रो लाइन 1A आणि मेट्रो लाइन 2 या दोन नव्या मार्गांचे DPR म्हणजेच सविस्तर प्रकल्प अहवाल CIDCOने तयार करून राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवले आहेत.

या दोन्ही प्रकल्पांचा अंदाजे खर्च 5,557 कोटी असून, त्यामुळं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह शहरातील वेगाने विकसित होणाऱ्या भागांची कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आहे.

सध्या नवी मुंबई मेट्रो लाइन 1 ही CBD बेलापूर ते पेंधरदरम्यान धावते. खारघर आणि तळोजामार्गे जाणाऱ्या या 11.1 किमी मार्गावर 11 स्थानकं आहेत. नोव्हेंबर 2023 पासून या मार्गावर व्यावसायिक सेवा सुरू आहे.

प्रस्तावित विस्तारामध्ये तळोजा, कळंबोली आणि खांदेश्वर या भागांना मेट्रोने जोडण्याची योजना आहे. सध्याच्या बेलापूर-पेंधर मार्गाला नव्या मार्गांशी जोडून अधिक एकत्रित मेट्रो नेटवर्क तयार करण्याचा प्रस्ताव आहे.

यातील एका मार्गाचा पुढे मुंबई–नवी मुंबई विमानतळ मेट्रो कॉरिडॉरशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

या विस्ताराचा फायदा कामोठे, कळंबोली, तळोजा आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना होणार असून, विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी रस्ते वाहतुकीला पर्याय मिळेल.

नवी मुंबईची वाढती लोकसंख्या, वाढतं व्यावसायिक क्षेत्र आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे वाढणारी वाहतूक लक्षात घेता, या मेट्रो विस्ताराला महत्त्व प्राप्त झालं आहे. मेट्रोमुळे लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यास आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

मात्र, या प्रकल्पांना अद्याप आवश्यक सरकारी मंजुरी मिळणं बाकी आहे. मंजुरीनंतरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.



हेही वाचा

पोलिसांसाठी वोक्हार्ट हॉस्पिटलचा विशेष उपक्रम

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा