Advertisement

ऑगस्टमध्ये उपनगरी रेल्वेगाड्या सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार - अस्लम शेख


ऑगस्टमध्ये उपनगरी रेल्वेगाड्या सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार - अस्लम शेख
SHARES
मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये मुंबईची लाइफलाइन लोकल बंद करण्यात आली. कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळं लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीत तो पसरण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळं लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता हळूहळू रेल्वे सेवा पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आहे. त्यानुसार, लवकरच उपनगरी रेल्वेगाड्या सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मागील ३ महिन्यांपासून बंद असलेल्या उपनगरी रेल्वेगाड्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. त्यामुळं रेल्वेगाड्या सुरु झाल्यास अनेकांना दिलासा मिळणार आहे.

रेल्वेचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित नसल्याने यात राज्य सरकारला काहीच करता येत नाही. मात्र केंद्र सरकार याबाबत विचार करीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्या १५ जूनपासून अल्प प्रमाणात सुरू झाल्या असल्या तरी सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच त्यातून प्रवासाची मुभा आहे. सर्वसामान्यांना यातून प्रवासाची मुभा अद्याप देण्यात आलेली नाही.

सध्या मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर लोकल धावत असून, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत आहे. सुरुवातीला कमी लोकल सेवेत आणण्यात आल्या होत्या. परंतु, लोकलमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता लोकलच्या फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली. मात्र अद्याप समान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळं अनेक सामान्यांना निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी बेस्ट बस अथवा खाजगी वाहतुकीने जावं लागतं.



हेही वाचा -

Jio 5G: पुढच्या वर्षी येणार जिओचं ५ जी नेटवर्क- मुकेश अंबानी

‘या’ परिसरात साचलं पाणी, पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ते केले बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा