Advertisement

अंधेरी बनला कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

धारावीतील रुग्णांची संख्या घटत आहे. पण आता मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे.

अंधेरी बनला कोरोनाचा नवा हॉटस्पॉट
SHARES

मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाल्यानंतर धारावीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत होते. धारावी कोरोना रुग्णांचा हाॅटस्पाॅट झाला होता. आता धारावीतील रुग्णांची संख्या घटत आहे. पण आता मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. अंधेरीमध्ये धारावीपेक्षाही अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. 


मुंबईतील इतर भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असून आता नवे हॉटस्पॉट समोर येऊ लागले आहेत. मुंबई महापालिकेच्या २२ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार,  पालिकेच्या के पूर्व  वॉर्डमधील कोरोना रुग्णांची संख्या ४७४६ वर गेली आहे.  के पूर्वमध्ये अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व आणि जोगेश्वरी पूर्व या भागांचा समावेश आहे. तर के पश्चिममधील रूग्णांची संख्या आता ३९९७ झाली आहे. यामध्ये अंधेरी पूर्व आणि पश्चिमधील रुग्णांची संख्या अधिक आहे.


 के पूर्व आणि जी उत्तर या दोन वाॅर्डमधील रुग्णांची संख्या ४ हजारांच्या वर गेली आहे. तर १२ वाॅर्डमधील रुग्णसंख्या ३ हजारांच्या वर आणि ६ वाॅर्डमधील रुग्णसंख्या २ हजारांच्या वर आहे. पालिकेने  के पूर्व मध्ये ६४४ इमारती सीलबंद केल्या असून प्रभाग के पश्चिम येथे २६९ इमारती सीलबंद करण्यात आल्या आहेत. मुंबईत  के पूर्वमध्ये सर्वाधिक इमारती सील करण्यात आल्या आहेत.



हेही वाचा -

मुख्यमंत्र्यांच्या 'मातोश्री' परिसरात कोरोनाचा शिरकाव

Cops Track Down 44 ‘Missing’ Covid Patients : ‘त्या’ बेपत्ता रुग्णांना शोधण्यात यश



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा