Advertisement

घाटकोपर, मुलुंड, वांद्रेमध्ये धोकादायक इमारतींची संख्या सर्वाधिक

मुंबई शहर व उपनगरातील सर्व खासगी व पालिकेच्या अखत्यारितील इमारतींचे पावसाळ्याच्या आधी सर्वेक्षण केलं जातं.

घाटकोपर, मुलुंड, वांद्रेमध्ये धोकादायक इमारतींची संख्या सर्वाधिक
SHARES

मुंबई महापालिकेने यंदा पालिकेच्या अखत्यारीतील ४४३ इमारती धोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत. यामध्ये घाटकोपर, मुलुंड आणि वांद्रे पश्चिमधील सर्वाधिक १५६ इमारती धोकादायक आहेत. 

मुंबई शहर व उपनगरातील सर्व खासगी व पालिकेच्या अखत्यारितील इमारतींचे पावसाळ्याच्या आधी सर्वेक्षण केलं जातं. त्यानंतर धोकादायक इमारतींची संख्या जाहीर केली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धोकादायक इमारती कमी आहेत. दोन वर्षांपूर्वी मुंबईत ६१९ अतिधोकादायक इमारती होत्या. गेल्यावर्षी हा आकडा ४९९ होता. यापैकी ५० हून अधिक इमारती पाडल्या असून त्यांचा पुनर्विकास होणार आहे. 

धोकादायक इमारतींच्या यादीत कुलाबा विभागातील बेस्टच्या मालकीची मेहेर मॅन्शन, डी विभागात ताडदेव येथील गंगा-जमुना चित्रपटगृह, एफ-दक्षिणमध्ये लालबागचे गणेश टॉकीज, एफ उत्तरमधील सायन येथील पंजाबी कॉलनीतील सर्व २५ इमारतींचा समावेश आहे. 

धोकादायक इमारती

वाॅर्ड                          इमारती 

एन (घाटकोपर)              ५६ 

एच पश्चिम ( वांद्रे)          ५१

टी (मुलुंड)                       ४९

के पश्चिम (अंधेरी)           ३७

 के पूर्व (अंधेरी)                ३१

पी उत्तर (मालाड)            २८

एच (वांद्रे पूर्व)                  २७



हेही वाचा -

Containment Zones List Thane : ठाणेमध्ये 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन

मुंबईत ६९१ इमारती सील, 'ही' आहे यादी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा