Advertisement

धोकादायक इमारतींबाबत अडचणीच्या निवारणास म्हाडाकडून हेल्पलाइन

कोरोनामुळे लाॅकडाऊन लागून असल्याने म्हाडाला यंदा धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करता आलं नाही. त्यामुळे म्हाडाने सर्व कार्यकारी अभियंत्यांना लोकांसाठी ऑनलाइन उपलब्ध राहण्याचे आदेश दिले आहेत.

धोकादायक इमारतींबाबत अडचणीच्या निवारणास म्हाडाकडून हेल्पलाइन
SHARES

कोरोनामुळे लाॅकडाऊन लागून असल्याने म्हाडाला यंदा धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करता आलं नाही. त्यामुळे म्हाडाने सर्व कार्यकारी अभियंत्यांना लोकांसाठी ऑनलाइन उपलब्ध राहण्याचे आदेश दिले आहेत. धोकादायक इमारतींबाबत अडचण असल्यास म्हाडाच्या हेल्पलाइनवरही लोकांना संपर्क साधता येणार आहे.

पालिका व म्हाडाकडून दरवर्षी पावसाळ्याआधी सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी घोषित केली जाते. मात्र, यंदा लाॅकडाऊनमुळे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करण्यात आलेलं नाही. म्हाडाने धोकादायक इमारतींचा साधारण अंदाज घेतला असून एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. संबंधित विभागातील कार्यकारी अभियंता तसेच वास्तुरचनाकार आणि कंत्राटदारांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. पावसाळ्यापूर्वी करावयाच्या इमारतीतील डागडुजींनाही परवानगी देण्यात आली असल्याचं इमारत व दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले.

घोसाळकर यांनी सांगितलं की, आपण सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून सर्वांना घरातून काम करण्यास सांगितले आहे. सर्व कार्यकारी अभियंत्यांना भ्रमणध्वनीवर २४ तास उपलब्ध राहण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळापूर्व कामांची यादी करून संबंधित कंत्राटदारांची नियुक्ती करून धोकादायक इमारतींबाबत खबरदारी घेण्यास सांगितले आहे. याबाबतचा अहवाल या सर्व अधिकाऱ्यांना १७ मेपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे. 

वास्तुरचनाकार आणि कंत्राटदारांकडून संभाव्य धोकायदायक इमारतींचा आढावा घेण्यात आल्याचे मुख्य अधिकारी सतीश लोखंडे यांनी सांगितले.धोकादायक इमारतींबाबत काहीही अडचण असल्यास म्हाडाच्या नियंत्रण कक्षाशी ०२२-२३५३६९४५ किंवा ०२२-२३५१७४२३ या दूरध्वनींवर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे.

आपत्कालीन परिस्थितीत संपर्क

ए- विभाग – वराडे (९८९२४३६८२१)

सी- एक व डी- तीन – बी. एस. काळे (९८६९५१४१४३)

सी- दोन – एम. एस. शितोळे (९९७५५०४७१७)

सी- तीन – वेसावे (९५७९१३४१४५)

डी- एक – सुरेश कुमार (९८२०४८४४२३)

डी- दोन- अनिल राठोड (९८३३४३४९४९)

ग- दक्षिण – सुरवाडे (९१६७४६९७१४)

बी- एक – मयूर सोनकुसरे (९५६१२१६७९७)

बी- दोन – सी. जे. राव (९८२०१५३३७५)

ई- एक – एम. एन. सोनटक्के  (९९८७३०७०३५)

ई- दोन – तोनशाळ (९८२०३२२९५९)

ग- उत्तर – अहेरवार (९७०२३१४७३७)

एफ- उत्तर – वाळेकर (८१०४२०३१८४) आणि एफ- दक्षिण – श्रीमती जगताप (९१६७२५०९७७).



हेही वाचा -

पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वत: मुंबईचे पोलिस आयुक्त रस्त्यावर

दारुच्या होम डिलिव्हरीसाठी रेस्टॉरंट मालकांची सरकारला विनंती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा