Advertisement

दारुच्या होम डिलिव्हरीसाठी रेस्टॉरंट मालकांची सरकारला विनंती

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्याच्या प्रयत्नांना दारुच्या होम डिलिव्हरीमुळे बळकटी मिळेल, असं रेस्टॉरंट मालकांचं म्हणणं आहे.

दारुच्या होम डिलिव्हरीसाठी रेस्टॉरंट मालकांची सरकारला विनंती
SHARES

दारुची होम डिलिव्हरी (Home delivery) देण्याची परवानगी सरकारकडे मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसह आता रेस्टॉरंट्स मालकांनी मागितली आहे. कोरोना व्हायरसशी (Coronavirus Update) मुकाबला करण्याच्या प्रयत्नांना दारुच्या (liquor) होम डिलिव्हरीमुळे बळकटी मिळेल, तसंच या बंदीमुळे ठप्प पडलेला व्यवसायालाही हातभार लागेल, असं या कंपन्यांचं म्हणणं आहे.

या संदर्भात बिअर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची संघटना ऑल इंडिया ब्रेवर्स असोसिएशनने फ्लिपकार्ट, अॅमेझॉन यासोबतच स्विगी, झोमॅटो सारख्या खाद्यपदार्थांची डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्यांना विशेष परवाने देण्याची सूचनाही केली आहे. परवानाधारक मद्यविक्रेत्यांकडून या कंपन्या ऑनलाईन ऑर्डर घेऊन दारु घरोघरी पोहोचवू शकतील. राज्यातील उत्पादन शुल्क विभागानंही ऑनलाईन ऑर्डर घेण्यासाठी पोर्टल तयार करावा, अशी मागणीही या संघटनेनं केली आहे.

रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सुमारे ३००० कोटी रुपयांचा मद्यसाठा उपलब्ध आहे. हा साठा संपवण्यासाठी होम डिलिव्हरीची परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारांकडे करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय रेस्टॉरंट संघाचे अध्यक्ष अनुराग कटरियार यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही या काळात मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. आमच्याकडे सध्याच्या घडीला महागड्या मद्याचा साठा आहे. त्याचबरोबर आमच्यासमोर रोखीचे संकट आहे. मद्यविक्रीला काही राज्यांनी परवानगी दिल्यामुळे आता आम्हाला थोडा आशेचा किरण दिसत आहे. आमच्याजवळ असलेला साठा ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून विकण्यास परवानगी मिळावी, अशी आमची सर्व राज्य सरकारांना विनंती आहे. यामुळे रेस्टॉरंटकडे असेलला मद्याचा साठा संपण्यास मदत होईल. तसंच यामुळे मिळालेल्या पैशांतून व्यवसायाला आधार मिळेल.

नवभारत टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, ऑनलाईन मद्यविक्रीमुळे सोशल डिस्टन्सिंगचंही योग्य रितीनं पालन करता येईल, असा त्यांचा दावा आहे. यासाठी काही कायद्यात बदल करावे लागतील. याची कल्पना असली तरी सद्यस्थिती पाहता हे पाऊल उचलावे लागेल. यासाठी खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्याही तयार असल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार काही कंपन्यांसोबत याबाबत बोलणंही सुरू असल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयानं देखील नुकत्याच केलेल्या सुचनेत होम डिलिव्हरी आणि ऑनलाईन विक्रीवर राज्य सरकारांनी विचार करावा, असं म्हटलं होतं.

 
काही दिवसांपूर्वी सोशल डिस्टसिंगच्या शर्थीवर दारूची दुकानं खोलण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा वाजवले. त्यामुळे दारूची दुकानं खुली ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यानंतर दारूची देखील होम डिलिव्हरी करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली.



हेही वाचा

अत्यावश्यक सेवेकरता पोलिसांनी वाटले 3 लाख 20 हजार पास

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा