पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वत: मुंबईचे पोलिस आयुक्त रस्त्यावर


पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वत: मुंबईचे पोलिस आयुक्त रस्त्यावर
SHARES
कोरोनाशी लढण्यात अपेक्षेप्रमाणेच मुंबईचे पोलिस नागरिकांच्या संरक्षणाकरता पून्हा रस्त्यावर उतरलेत, अशातच काही पोलिस या महामारीने आजारी पडले, तर पोलिसांवरील हल्याच्या घटना ही कमी होत नाही. अशातच पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी स्वत: पोलिस आयुक्त परमबिर सिंग हे रस्त्यावर उतरले आहेत.

मागील दोन महिन्यांपासून कोरोना विरोधात प्रशासनाचा लढा सुरू आहे. त्यात पोलिस ही जीवाची पर्वा न करता रस्त्यावर 24 तास बंदोबस्त करत आहे. माञ तो ही माणूस आहे आणि थकलाय. तरी ही जनतेच्या सेवेसाठी आज ह सक्षम आहे. अशातच सध्याच्या परिस्थितीत पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वत: पोलिस आयुक्त परबिर सिंग हे रस्त्यावर उतरले आहेत. नाकाबंदीत गस्त घालणाऱ्या रुग्णालयांच्या सेवेसाठी तैनात असलेल्या पोलिसांची परमबिर हे स्वत:भेट घेऊन चौकशी करत आहेत.

नुकतीच आयुक्तांनी नाकाबंदी असलेल्या वनराई, मालाड, मालवणी आणि समता नगर येथे भेट दिली आणि ऑन ड्युटी असलेल्या पोलिसांना धीर देत  त्यांचे मनोधैर्य वाढवले आहे. मुंबई पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी उत्तर मुंबईतील अनेक ठिकाणी कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिसांशी संवाद साधला. सिंग यांनी दहिसर चेक नाका जो मुंबई शहराचा एन्ट्री पॉईंट आहे तेथे देखील भेट दिली. मुंबईत कोरोनामुळे ४ पोलिसांचा मृत्यू झाल्याने मुंबई पोलीस दलात भीतीचे सावट आहे. या सगळीकडे आपलं कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांची पोलीस आयुक्त सिंग यांनी चौकशी करून त्यांना फिल्डवर असताना विशेष काळजी घेण्यास सांगितली. तसेच त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोबल बंधावण्याचे मोलाचं काम सिंग यांनी केले. 
संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा