Advertisement

स्वरा भास्करचा रीया चक्रवर्तीला पाठिंबा, नेटिझन्सनी केलं ट्रोल

स्वराला ट्रोलिंगची शिकार व्हावं लागलं आहे. अनेकांनी स्वराला तिच्या वक्तव्यावरून लक्ष्य केलं आहे.

स्वरा भास्करचा रीया चक्रवर्तीला पाठिंबा, नेटिझन्सनी केलं ट्रोल
SHARES

अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar)नं रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) पाठिंबा दिला आहे. ट्विटरवर स्वरानं आपलं मत याबाबत व्यक्त केलं आहे. दरम्यान यानंतर मात्र स्वराला ट्रोलिंगची शिकार व्हावं लागलं आहे. अनेकांनी स्वराला तिच्या वक्तव्यावरून लक्ष्य केलं आहे.

स्वरानं तिच्या ट्वीटमध्यं असं म्हटलं आहे की, रियाबरोबर प्रचंड खतरनाक आणि विचित्र मीडिया ट्रायल होत आहे. ज्यावर मॉब जस्टिसचा प्रभाव आहे. सु्प्रीम कोर्टानं याकडे लक्ष घालण्याची विनंती स्वरानं केली आहे. मात्र यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

सुशांत सिंह राजपूतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केला आहे. त्यांनी याप्रकरणी पाटणा पोलिसांत एफआयआर दाखल केली होती. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांच्या पथकानंही मुंबई गाठली. आता हे प्रकरण सीबीआयकडे आहे. दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची मनी लाँड्रिंगच्या अँगलनं चौकशी करत आहे.

रियानं सोमवारी सोमवारी 'अनफेअर मीडिया ट्रायल'च्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. मीडियामध्ये सातत्यानं सनसनाटीकरण सुरू असल्यामुळे तिला याचा खूप त्रास होत असल्याचा आणि तिच्या गोपनीयतेच्या हक्काचं उल्लंघन होत असल्याचं तिनं यात म्हटलं आहे.



हेही वाचा

प्रसिद्ध गझलकार राहत इंदौरी कालवश, ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ मुळे चर्चेत

मला न्यूझीलंडला जाऊन राहायचंय, केदार शिंदेच्या वक्तव्यावर ट्रोलर्स नाखूश

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा