Advertisement

प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे कोरोनाग्रस्त, लीलावती रुग्णालयात दाखल

प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना वांद्र्यातील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे कोरोनाग्रस्त, लीलावती रुग्णालयात दाखल
SHARES

प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना वांद्र्यातील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून विजय केंकरे यांना सौम्य ताप येत होता. त्यामुळे ते होम क्वारंटाइन होते. परंतु अचानक तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. (marathi director vijay kenkre tested covid19 positive)

काही दिवसांपूर्वीच विजय केंकरे यांच्या आई ललिता केंकरे यांचं निधन झालं होतं. तेव्हापासून विजय केंकरे घरीच होते. परंतु मागील ८ ते ९ दिवसांपासून त्यांना ताप येत होता. कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

साधारणत: ३ महिन्यांपूर्वी ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचं कोरोनाची लागण झाल्याने निधन झालं होतं. कोरोनाची लक्षणं जाणवत नसली, तरी थकवा जाणवत असल्याने मतकरी गोदरेज रुग्णालयात चेकअपसाठी अॅडमिट झाले होते. यावेळी त्यांची COVID 19 टेस्ट करण्यात आली, ही टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचं लक्षात आल्यावर त्यांना उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

संबंधित विषय
Advertisement