Advertisement

'सडक २' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, संजय, आलिया आणि सिद्धार्थचा ट्रिपल धमाका

सडक २ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पण या ट्रेलरला लाईक्सपेक्षा डिस्लाईक्स जास्त आहेत. boycott sadak 2 असा ट्रेंडदेखील सुरू आहे.

'सडक २' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, संजय, आलिया आणि सिद्धार्थचा ट्रिपल धमाका
SHARES

अभिनेता संजय दत्तचा आगामी चित्रपट सडक २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. महेश भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत आहेत. २८ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट पाहता येईल.

'सडक 2' हा १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सडक'चा सिक्वेल आहे. यात संजय दत्त एका ट्रॅव्हल एजंटच्या भूमिकेत आहे. संजय दत्तच्या आयुष्यातील सर्वांत प्रिय व्यक्तीचा (पूजा भट्ट) मृत्यू होतो आणि त्यानंतर त्याचा जगण्यातला रस निघून जातो. अशातच त्याच्या आयुष्यात आर्या (आलिया भट्ट) एक नवीन उमेद घेऊन येते.

संजय दत्त, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर मिळून कैलाश पर्वतावर जाण्यासाठी तयार होतात आणि या प्रवासात काय घडतं याची कथा चित्रपटात पाहायला मिळेल. प्रवासादरम्यान, आलिया आणि आदित्य यांची रोमँटिक लव्ह स्टोरी आणि संजय दत्तचा इमोशनल अँगल दाखवला गेला आहे.

दरम्यान विश हिंदू परिषदेनं या चित्रपटाचा विरोध केला आहे. हिंदूविरोधी चित्रपट असल्याचं विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विजय तिवारी यांनी म्हटलं आहे. शिवाय ते म्हणाले की, यात केवळ नेटिझम्सचा मारा आहे. संजय दत्त हा सुनील दत्त यांचा मुलगा आहे. तर पूजा आणि आलिया महेश भट्टच्या मुली आहेत. आदित्य कपूर सिद्धार्थ रॉयचा भाऊ आहे. यालाच नेटिझम्स म्हणतात.हेही वाचा

...म्हणून संजय दत्त अभिनीत 'सडक 2' चित्रपटाला विश्व हिंदू परिषदेचा विरोध

संजय दत्तच्या आजाराबद्दल पत्नी मान्यताचं निवेदन, चाहत्यांना केलं 'हे' आवाहन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement