अभिनेता अक्षय कुमार आता डिजीटल विश्वात डेब्यू करत असल्याची बातमी आम्ही आपल्याला दिली आहेच. नेहमीच काहीतरी धमाकेदार करणाऱ्या अक्षयनं या शोच्या लाँचिंग प्रसंगी चक्क आपल्या अंगावरील कपडे पेटवत रॅम्प वॅाक केलं. या प्रकारामुळे अक्षयची पत्नी ट्विंकलचा पारा चढला असून तिने नवऱ्याला जाहीर धमकी दिली आहे.
झळा ट्विंकलला
टर्फ क्लबमध्ये जरी अक्षयने आगीशी खेळ केला असला तरी त्याच्या झळा ट्विंकलला बसल्या आहेत. अक्षयनं केलेल्या या स्टंट्समुळं ट्विंकल भलतीच रागावली आहे. ट्विटरवर आपला रोष व्यक्त करत तिनं अक्षयला थेट धमकवी दिली आहे. "तू घरी ये तुला मारूनच टाकते", अशा शब्दांमध्ये ट्विंकलनं अक्षयचा समाचार घेतला आहे. या ट्विटमुळं दोघांमध्ये काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं जाणवत असलं तरी कलाकार पती-पत्नीही आज ट्विटरचा वापर थट्टा-मस्करी करण्यासाठी करत असल्याचं आपण पाहिलं आहे.
वेब सिरीजच्या विश्वात
अक्षय आता वेब सिरीजच्या विश्वात पदार्पण करत आहे. अॅमेझॅान प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणाऱ्या 'द एंड' या शोमध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिकेत धक्कादायक अॅक्शन करताना दिसणार आहे. या शोच्या शुभारंभ प्रसंगी अक्षयनं आपल्या कपड्यांना आग लावून स्टंट केला होता. त्यावर चिडलेल्या अक्षयच्या पत्नीनं असं ट्विट केलं. अक्षयनंही ट्विंकलला ट्विटच्याच माध्यमातून उत्तर दिलं आहे. ट्विटरवर प्रतिक्रिया देताना अक्षय म्हणाला की, "वास्तविक आगीपासून मला जेवढी भीती वाटली नाही तेवढी बायकोच्या ट्विटनं वाटायला लागली आहे."

हेही वाचा -
विश्वचषकासाठी गायक-संगीतकार पुन्हा बनला क्रिकेटर!
सेना-भाजप युतीविरोधात प्रचार करणार; मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय