विश्वचषकासाठी गायक-संगीतकार पुन्हा बनला क्रिकेटर!

'८३' या सिनेमात कपिलची भूमिका रणवीर सिंग साकारणार असून, इतर खेळाडूंच्या भूमिकांसाठी कलाकारांची निवडप्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत गायक-संगीतकार हार्डी संधूला मदन लाल यांची भूमिका साकारण्यासाठी निवडण्यात आलं आहे.

  • विश्वचषकासाठी गायक-संगीतकार पुन्हा बनला क्रिकेटर!
  • विश्वचषकासाठी गायक-संगीतकार पुन्हा बनला क्रिकेटर!
  • विश्वचषकासाठी गायक-संगीतकार पुन्हा बनला क्रिकेटर!
  • विश्वचषकासाठी गायक-संगीतकार पुन्हा बनला क्रिकेटर!
SHARE

आयुष्यात कधी, कोणाला, काय करण्याची संधी मिळेल ते सांगता येत नाही. त्यामुळंच आलेल्या संधीचं सोनं करतो तोच मोठा होतो. गायक-संगीतकार हार्डी संधूकडंही अशीच एक संधी चालून आली आणि रीअल लाईफमध्ये क्रिकेट खेळलेल्या हार्डी रील लाईफमध्ये क्रिकेटर बनण्याची संधी मिळाली.


विश्चचषक स्पर्धेचे सोनेरी क्षण

मागील बऱ्याच दिवसांपासून सगळीकडं दिग्दर्शक कबीर खानच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या '८३' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. १९८३ मध्ये माजी अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं जिंकलेल्या विश्चचषक स्पर्धेचे सोनेरी क्षण या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. या सिनेमात कपिलची भूमिका रणवीर सिंग साकारणार असून, इतर खेळाडूंच्या भूमिकांसाठी कलाकारांची निवडप्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत गायक-संगीतकार हार्डी संधूला मदन लाल यांची भूमिका साकारण्यासाठी निवडण्यात आलं आहे.


मदन लाल यांच्या भूमिकेत

खरं तर हार्डी आणि क्रिकेटचं खूप जवळचं नातं आहे. हार्डी आज जरी गायक-संगीतकार म्हणून नावारूपाला आला असला तरी पूर्वी तो अंडर-१९ क्रिकेटर होता. आता कबीर खानच्या '८३' मध्ये तो अॅाल राऊंडर मदन लाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मूळात गायक-संगीतकार असलेल्या हार्डीचा या सिनेमाच्या निमित्तानं बॅालीवुडमध्ये डेब्यू होणार आहे. १९८३ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर व्हिव्हियन रिचर्डस यांची महत्त्वपूर्ण विकेट घेण्याची कामगिरी मदन लाल यांनी बजावली होती. याखेरीज या सामन्यात त्यांनी मोहिंदर अमरनाथ यांच्या साथीनं सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. दोघांनीही अंतिम सामन्यात प्रत्येकी तीन बळी घेतले होते.


सात दिवसांचा वेळ

बॅालीवूडमध्ये डेब्यू करताना थेट क्रिकेटर मदन लाल यांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाल्यानं हार्डी खूप खुश आहे. याबाबत तो म्हणाला की, या सिनेमात बलविंदर सिंह संधू यांची भूमिका अम्मी विर्क साकारत आहे. त्यानं तसंच क्रिकेट टिमच्या कोचची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारानं मदन लाल यांच्या भूमिकेसाठी माझं नाव सुचवलं. यापूर्वी मी अंडर-१९ क्रिकेट खेळताना रणजी ट्रॅाफी क्रिकेट स्पर्धा खेळली आहे. मदन लाल यांच्या भूमिकेसाठी माझी अंतिम निवड करण्यापूर्वी तयारी करण्यासाठी कबीर सरांनी मला सात दिवसांचा वेळ दिला होता. त्या वेळेत मी स्वत:ला मदन लाल बनण्यासाठी तयार केलं.


व्यक्तिमत्वाचा बारकाईनं अभ्यास

पडद्यावर आपल्याला मदन लाल यांची भूमिका अत्यंत सफाईदारपणं साकारता यावी यासाठी हार्डीनं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खूप बारकाईनं अभ्यास केला आहे. मदन लाल यांचं व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी हार्डीनं त्यांचे व्हिडीओ पाहिले आहेत. त्यातून त्यांच्या सवयी, चालणं, बोलणं, खेळणं सारं काही शिकण्याचा प्रयत्न केला आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे बंगलूरू येथे झालेल्या राष्ट्रीय शिबिरामध्ये स्वत: मदन लाल यांनी हार्डीला क्रिकेटचे धडे दिले होते. त्यावेळी ते हार्डीचे कोच होते. '८३' या सिनेमासाठी निवड झाल्यावर हार्डीनं त्यांच्याशी संवादही साधला होता.


चित्रीकरण वास्तववादी लोकेशनवर

हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषेत बनणाऱ्या या पहिल्या त्रिभाषिक सिनेमाचं चित्रीकरण पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू करण्यात येणार आहे. या सिनेमाचं चित्रीकरण वास्तववादी लोकेशनवर करण्यात येणार आहे. या सिनेमात अम्मी विर्क, सय्यद किरमानींच्या रूपात साहिल खट्टर, कृष्णमाचार्य श्रीकांतच्या रूपात जिवा आणि प्रबंधक पीआर मान सिंह यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहेत. याशिवाय ताहिर भसीन, साकिब सलीम यांचाही या विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघात समावेश आहे.हेही वाचा -

आणि अक्षयनं कपड्यांना आग लावून केलं रॅम्प वॅाक!

'वर्ल्ड थिएटर डे'च्या निमित्तानं रंगभूमीला मानवंदनासंबंधित विषय
ताज्या बातम्या