Advertisement

आणि अक्षयनं कपड्यांना आग लावून केलं रॅम्प वॅाक!

मुंबईतील महालक्ष्मी येथील रॅायल वेर्स्टन इंडिया टर्फ क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शुभारंभाच्या सोहळ्यात अक्षयनं धडाकेबाज स्टंट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला

आणि अक्षयनं कपड्यांना आग लावून केलं रॅम्प वॅाक!
SHARES

अभिनेता अक्षय कुमार कधी काय करेल याचा नेम नाही. केवळ एखाद्या भूमिकेसाठीच नव्हे, तर शोसाठीही कोणतंही धाडस करायला अक्षय मागे पुढे पाहात नाही हे आपण आजवर पाहिलं आहे. आता 'द एंड' या आपल्या पदार्पणातील डिजीटल शोच्या लाँचिंग प्रसंगी त्यानं चक्क कपड्यांना आग लावून रॅम्प वॅाक केलं.



पहिला डिजीटल शो

अक्षय कोणतीही गोष्ट अगदी मनापासून करतो. मग तो अभिनय असो, वा सैनिकांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढं करणं असो... प्रत्येक बाबतीत तो इतर कलाकारांपेक्षा खूप वेगळा आणि धाडसी आहे. त्याचं हेच धाडस दिवसेंदिवस त्याच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ करत आहे. आता तो डिजीटल विश्वामध्ये प्रवेश करत आहे. नेहमीच आपल्या अॅक्शन आणि स्टंट्सने लक्ष वेधून घेणाऱ्या अक्षयनं आपल्या पहिल्या डिजीटल शोसाठी जेव्हा कपड्यांना आग लावून रॅम्प वॅाक केलं, तेव्हा पाहणारेही आश्चर्यचकित झाले.



धडाकेबाज स्टंट

मुंबईतील महालक्ष्मी येथील रॅायल वेर्स्टन इंडिया टर्फ क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शुभारंभाच्या सोहळ्यात अक्षयनं धडाकेबाज स्टंट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अॅमेझॅान प्राईम व्हिडीओ ओरिजनल आणि अबुंडेंटिया एन्टरटेन्मेंटच्या संयुक्त विद्यमानं तयार केल्या जाणाऱ्या या डिजीटल शोमध्ये प्रेक्षकांना धडाकेबाज अॅक्शन पाहायला मिळेल. याची झलकच जणू अक्षयनं शुभारंभाच्या सोहळ्यात कपड्यांना आग लावून रॅम्प वॅाक करत दाखवली.



द एंड

या शोमध्ये अक्षयसोबत दिसणाऱ्या सर्व कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. अक्षयनं दाखवलेल्या धाडसाचं सर्वांनीच कौतुक केलं. अॅमेझॅान प्राईम व्हिडीओ ओरिजनल आणि अबुंडेंटिया एन्टरटेन्मेंट यांनी यापूर्वी 'ब्रीद' ही यशस्वी सिरीज तयार केली होती. त्यानंतर आता 'द एंड' या सिरीजच्या निमित्तानं डिजीटल विश्वात सक्रिय असलेली या दोन मोठ्य संस्था धडाकेबाज कामगिरी करण्यासाठी दुसऱ्यांदा एकत्र आल्या आहेत.



हेही वाचा -

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

मुंबई राज्यातील सर्वात प्रदूषित शहर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा