Advertisement

'वर्ल्ड थिएटर डे'च्या निमित्तानं रंगभूमीला मानवंदना

प्रत्येक कलाकारानं कधी ना कधी रंगगभूमीवर पाऊल ठेवलेलं असत. रंगभूमीवरूनच तो गगनभरारी घेत छोट्या पडद्यापासून मोठ्या पडदा व्यापून टाकतो. अशा या रंगभूमीला 'वर्ल्ड थिएटर डे'च्या निमित्तानं एक आगळीवेगळी सलामी दिली जाणार आहे.

'वर्ल्ड थिएटर डे'च्या निमित्तानं रंगभूमीला मानवंदना
SHARES

रंगभूमी ही कलेची मायभूमी मानली जाते. प्रत्येक कलाकारानं कधी ना कधी रंगगभूमीवर पाऊल ठेवलेलं असत. रंगभूमीवरूनच तो गगनभरारी घेत छोट्या पडद्यापासून मोठ्या पडदा व्यापून टाकतो. अशा या रंगभूमीला 'वर्ल्ड थिएटर डे'च्या निमित्तानं एक आगळीवेगळी सलामी दिली जाणार आहे.


ड्रामा धमाल

१९६१ मध्ये सुरू झालेल्या रंगभूमीच्या परंपरेचा सोहळा जगभरात २७ मार्च रोजी साजरा केला जातो. रंगभूमीसोबतच मागे विंगेत काम करणाऱ्या प्रत्येकाच्या प्रयत्नांना, मेहनतीला आणि कार्याला या दिवशी एका अर्थानं मानवंदनाच दिली जाते. या निमित्तानं मुंबईतही 'ड्रामा धमाल'मधून हा जंगी सोहळा रंगणार आहे. रेजची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाला नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सचं पाठबळ लाभलं आहे. २७ मार्चच्या संध्याकाळी नाटकं, स्वगतं, गाणी, नृत्य, स्टँड अप असे विविध कार्यक्रम सादर केले जातील. हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजराती अशा भाषांमध्ये सादर होणाऱ्या या भव्य सोहळ्यासाठी ५० हून अधिक कलाकार एकत्र येणार आहेत.


तिकिटविक्रीचा निधी नाट्यक्षेत्राकडे

ही रात्र फक्त सोहळ्यांची नसेल, तर ती असेल रंगभूमीचे पांग फेडण्यासाठी आणि या क्षेत्राला भक्कम ठेवणारे आधारस्तंभ बनलेल्या व्यक्तींचे आभार मानण्याची... या कार्यक्रमाच्या तिकिटविक्रीतून मिळालेला निधी पुन्हा नाट्यक्षेत्राकडे वळवून आजवर अंधारात असलेल्या या क्षेत्रातील खऱ्या हिरोंसाठी वापरला जाईल. ड्रामा धमाल २७ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता एनसीपीएमधील टाटा थिएटरमध्ये सादर होईल.या कलाकारांचा सहभाग

'चला, रंगभूमी साजरी करूया!' या टॅगलाईनखाली आकर्ष खुराना, अनादी नागर, अनाहिता ओबेरॉय, अनुवब पाल, बोमी दोतीवाला, भावना पानी, बुर्जोर पटेल, चैतन्य शर्मा, दानेश इरानी, दानेश खंबाटा, दीपल दोषी, धीर हिरा, दिलशाद इदिबाम, फाझह जलाली, गर्सन डीकुन्हा, गीतांजली कुलकर्णी, जीम सरभ, कशिन शेट्टी, कौस्तव सिन्हा, केथ सिक्वेरा, कुनाल रॉय कपूर, कर्थ्यन दोशी, लॉरेन रॉबिनसन, मानसी मुलतानी, मेहेर मेस्त्री, मेहरजाद पटेल, मोहित टाकळकर, मुस्कान जाफरी, निहारिका लायरा दत्त, कौसर ठाकोर पद्मसी, राहुल डीकुन्हा, राजेश्वरी सचदेव, रजित कपूर, रोहिनी रामनाथन, रुबी पटेल, रात्यशा राठोड, सलोम रीबेलो, संदेश कुलकर्णी, शीना खालिद, शेरनाझ पटेल, सिद्धार्थ कुमार, सोनाली कुलकर्णी, उत्कर्ष मझुमदार, विक्रांत धोटे, वरुण बडोला, झफर कराचीवाला आदी कलाकार एनसीपीएच्या मंचावर एकत्र येणार आहेत.


थिएटरवाले एकत्र

जागतिक रंगभूमीदिनानिमित्त मुंबईतील थिएटरवाले एकत्र येत आहेत. या संध्येसाठी खास लिहिलेली नाटकं, रंगभूमीच्या सोहळ्यासाठी खास निर्मिलेली गीतं, स्टँड अप आणि नृत्ये सादर केली जाणार आहेत. हे सारं काही रंगभूमी आणि थिएटरशी संबंधित असेल. यात प्रेक्षक, पहिल्या प्रयोगाची उत्सुकतापूर्ण भीती, पडद्यामागे चालणाऱ्या खोड्या... इतकंच नाही तर नाटक पाहताना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे सगळं यात सादर करण्यात येणार आहे.हेही वाचा -

३ ड्रग्ज तस्करांना अटक; ३० किलो गांजासह नशेची औषधं हस्तगत

ठाणे शहरासाठी आता वर्तुळाकार मेट्रोसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा