सीबीएसईचा पेपर फुटला, सेलिब्रिटिंचा संताप झाला!

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • बॉलिवूड

इयत्ता दहावीचा सीबीएसई बोर्डाचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटलात्यानंतर हे दोन्ही पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला गेलाया निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांचा चांगलाच संताप झाला आहेया विरोधात सेलिब्रिटींनीही नाराजी व्यक्त केली आहे.

विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या फेरपरिक्षेबाबत अभिनेता फरहान अख्तरने खंत व्यक्त केली आहे. 'ज्यांची काहीच चूक नाही अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार हे ऐकूनच प्रचंड राग येतोयहे अत्यंत चुकीचे आहेया परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बळ येऊ दे' अशा आशयाचं ट्वीट फरहानने केलं आहे.

फरहानप्रमाणेच इमरान हाश्मीनेही या प्रकरणावर ट्वीटरवरून उपरोधिक भाष्य केलं आहेइमरानने ट्वीटमध्ये CBSCचा उल्लेख Corrupt Board For Students Education असा केला आहे.

तर अभिनेता विवेक ओबेरॉयने मुलांना या संधीचा फायदा घेत पुन्हा जोमाने अभ्यास करायचा सल्ला दिला आहे.


हेही वाचा

सीबीएसईचा १० वी, १२ वीचा पेपर फुटला, पुन्हा होणार परीक्षा

पुढील बातमी
इतर बातम्या