सीबीएसईचा १० वी, १२ वीचा पेपर फुटला, पुन्हा होणार परीक्षा


  • सीबीएसईचा १० वी, १२ वीचा पेपर फुटला, पुन्हा होणार परीक्षा
SHARE

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) च्या दहावी (गणित)आणि बारावीचा (अर्थशास्त्र) पेपर फुटल्याने या दोन्ही विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. या दोन्ही परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.


कधी फुटला पेपर?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दहावीच्या गणिताचा पेपर बुधवारी, तर बारावीच्या अर्थशास्त्राचा पेपर मंगळवारी घेण्यात आला होता. मंगळवारी रात्री दहावीचा पेपर फुटला. तर त्यापूर्वी बारावीचा पेपर देखील फुटला होता.


बोर्डाची अधिकृत माहिती

सीबीएसई बोर्डाने याची दखल घेतली आहे. ज्याने कुणी पेपर फोडला असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. बोर्डाच्या परीक्षेचं पावित्र्य राखण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने परीक्षा पुन्हा घेण्यात येतील. या दोन्ही परीक्षांच्या तारखा आणि इतर तपशील सीबीएसईच्या वेबसाईटवर एका आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असं सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या आपल्या निवेदनात म्हटलं आहे.हेही वाचा-

दहावीचा पेपर पुन्हा फुटला

दहावी पेपरफुटी प्रकरण: चौथ्या आरोपीला अटक

बारावी 'केमिस्ट्री'चा पेपर व्हॉट्सअॅपवर, अल्पवयीन मुलांसह चौघांना अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या