Advertisement

बारावी 'केमिस्ट्री'चा पेपर व्हॉट्सअॅपवर, अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक


बारावी 'केमिस्ट्री'चा पेपर व्हॉट्सअॅपवर, अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक
SHARES

परीक्षांच्या चोख आयोजनाबाबत पाठ थोपटून घेण्यासारखी परिस्थिती ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’त राहिली नसून लागोपाठ दुसऱ्या वर्षी मंडळाचा बारावीचा रसायनशास्त्र (केमिस्ट्री)चा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या पेपर फुटीप्रकरणी परळच्या भोईवाडा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह चौघांना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये एका २५ वर्षीय तरुणीचाही समावेश आहे.

परीक्षांचं अत्यंत काटेकोर पद्धतीने आयोजन करणार खातं, अशी ख्याती असलेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या प्रतिमेला यामुळे तडा गेला असून या विषयाच्या परीक्षार्थींना फेरपरीक्षेला सामोरे जावं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


काय आहे प्रकरण?

२८ फेब्रुवारी २०१८ रोजी बारावी रसायनशास्त्रा(केमिस्ट्री)ची परीक्षा होती. त्यानुसार परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी केमिस्ट्रीचा पेपर देण्यासाठी आला होता. मात्र पेपर सुरू होण्याच्या अर्धातास हा विद्यार्थी महाविद्यालयाच्या बाथरूममध्ये मोबाईलवर व्यस्त होता. महाविद्यालयातील शिक्षक धर्मेश मेहता यांना या विद्यार्थ्याचा संशय आल्यावर त्यांनी या विद्यार्थ्याच्या हातून मोबाइल घेऊन तो पाहिला असता, त्या मोबाइलवर २०१८ च्या बोर्ड परीक्षेची केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका होती.


प्रश्नपत्रिकेचं हाॅट्सअॅपवरून शेअरींग

ही प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवरून तो दुसऱ्या विद्यार्थ्यांना पाठवत होता. मेहता यांनी ही बाब महाविद्यालयाच्या वरिष्ठ शिक्षकांच्या निदर्शास आणून देत, भोईवाडा पोलिसांना बोलावलं. महाविद्यालयातील शिक्षक धर्मेश सतीश मेहता (४९) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी महाराष्ट्र विद्यापीठ व परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम १९८२ कलम ५(१), (२) व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ७२ अंतर्गत गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती मध्य प्रादेशिक परिमंडळाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त एस. जयकुमार यांनी दिली.


कुणाला अटक?

त्यानंतर भोईवाडा पोलिसांनी चौकशी करून १७ वर्षीय विद्यार्थ्याला २ मार्च रोजी ताब्यात घेतलं. त्याच्या मोबाइल क्रमांकावरून मिळालेल्या माहितीवरून या प्रकरणात ३ मार्च रोजी अल्पवयीन विद्यार्थ्यासह विभाकरकुमार सुबोध झा (२६) घाटकोपर, महेश दिनेश गुप्ता (२६), डोंबिवली, ३ शिल्पा भरत तिवारी (२५) घाटकोपर, मोहम्मद मेहफुज अब्दुल हकीन शेख (४०) मुंब्रा या चौघांना अटक करण्यात आली. चौकशी त्यांचा प्रश्नपत्रिका वितरीत करण्यास सहभाग असल्याचंही स्पष्ट झालं आहे. यासह भोईवाडा पोलिस राहुल सी.एल.एस याचा शोध घेत आहे.


या पूर्वीच्या घटना

मागील वर्षी देखील विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे पेपर फुटीचं सत्र सुरूच होतं. २०१७ मध्ये बारावीच्या कॉमर्स शाखेचा बुक किपिंग अँड अकाऊंटन्सीचा पेपर फुटला होता. कांदिवलीतील डॉ. टी. आर. नरवणे विद्यालयात हा प्रकार समोर आला होता. परीक्षेचं केंद्र असलेल्या डॉ. टी.आर. नरवणे विद्यालयात दोन विद्यार्थी ११.३० ते ११.४५ च्या सुमारास परीक्षेला आले.

त्यांच्यावर संशय आल्याने तपासणी करण्यात आली. या विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये बुक किपिंग अँड अकाऊंटन्सी विषयाची प्रश्नपत्रिका आढळून आली होती. याप्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत काही जणांना ताब्यात घेतलं होतं.


२०१७ व्हॉट्सअॅपवर पेपर कधी व्हायरल झाले?

  • २ मार्च - मराठी
  • ३ मार्चला - राज्यशास्त्र
  • ४ मार्चला - सेक्रेटरिअल प्रॅक्टिस, भौतिकशास्त्र
  • ६ मार्चला - गणित, संख्याशास्त्रहेही वाचा-

बारावीच्या पेपर तपासणीचा तिढा सुटला, शिक्षकांचा संप मागेसंबंधित विषय
Advertisement