दहावीचा पेपर व्हाॅट्सअॅपवर, तिघांना अटक

परीक्षा सुरू होण्याआधी पर्यावेक्षक संध्या विलास पवार यांना परीक्षा हाॅल बाहेर काही विद्यार्थी मोबाइलवर पाहून पुस्तकात डोकावत असल्याचं दिसलं. पाटील यांना त्यांच्यावर संशय आल्याने पाटील यांनी त्या मुलांचा मोबाइल पाहिला. तेव्हा त्यांना मोबाइलमध्ये सुरू होणाऱ्या पेपरची प्रश्नपत्रिका आढळून आली. पाटील यांनी या घटनेची माहिती पाटील त्वरीत शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या कानावर घातली.

दहावीचा पेपर व्हाॅट्सअॅपवर, तिघांना अटक
SHARES

बारावी पाठोपाठ आता दहावी इंग्रजीचा पेपर देखील व्हाॅट्स अॅपवर आल्याची धक्कादायक बाब घडकीस आली आहे. या प्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून ३ जणांना पोलिसांनी अटक केली असून ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आरोपींकडून पोलिसांनी ११ मोबाइल हस्तगत केले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

अंबोली परिसरातील वीरा देसाई रोडवरील एम. व्ही. एम स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये सोमवारी सोशल सायन्स (७३), हिस्ट्री पाॅलिटिकल सायन्स - पेपर १ (इंग्रजी माध्यम)चा पेपर होता. त्यासाठी हाॅल क्रमांक १६ मध्ये परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

संशयास्पद हालचाल

परीक्षा सुरू होण्याआधी पर्यावेक्षक संध्या विलास पवार यांना परीक्षा हाॅल बाहेर काही विद्यार्थी मोबाइलवर पाहून पुस्तकात डोकावत असल्याचं दिसलं. पाटील यांना त्यांच्यावर संशय आल्याने पाटील यांनी त्या मुलांचा मोबाइल पाहिला. तेव्हा त्यांना मोबाइलमध्ये सुरू होणाऱ्या पेपरची प्रश्नपत्रिका आढळून आली. पाटील यांनी या घटनेची माहिती पाटील त्वरीत शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या कानावर घातली.

गुन्ह्याची नोंद

त्यावेळेस शाळेने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं. पण, परीक्षा संपल्यानंतर मुख्यध्यापक आणि पाटील यांनी त्यांना अंबोली पोलिस ठाण्यात नेत, पेपर फुटीची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी भा.दं.वि ५, ६, ७, ८ आणि महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड तसंच इतर गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा १९८२ सब ६६ (ड) नुसार गुन्हा नोंदवला.

पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

या गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक रवींद्र साळुंखे आणि एन्काऊन्टर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या पथकाने प्रत्यक्ष पेपर फोडणाऱ्या आणि पेपर विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून तिघांना अटक केली. तर या तिघांकडून पोलिसांनी ११ मोबाइल हस्तगत केले आहेत. तसेच ज्या ८ विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पाठवण्यात आल्या होत्या. त्यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी अंबोली पोलिस अधिक तपास करत असल्याची महिती अंबोली पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा-

बारावी 'केमिस्ट्री'चा पेपर व्हॉट्सअॅपवर, अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा