दहावीचा पेपर पुन्हा फुटला


दहावीचा पेपर पुन्हा फुटला
SHARES

अंबोली पोलिस दहावीचा पेपर फोडणाऱ्यांचा पर्दाफाश करून त्यांना अटक करत नाहीत, तोच साकीनाका परीसरात पुन्हा दहावीचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी खासगी क्लासेसच्या दोन शिक्षकांना अटक केली आहे. फिरोज युसूफ अन्सारी (४२) आणि मुज्जमिल इक्बाल काझी (२७) अशी या दोघांची नावे आहेत.

साकीनाकाच्या काजूपाडा परिसरातील सेंट ज्यूड हिंग स्कूल शाळेत दहावीच्या संगणकाचा पेपर फुटल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी उघडकीस आला. हा पेपर देण्यासाठी आलेली १५ वर्षीय विद्यार्थिनी पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास आधी मोबाइलमध्ये पाहून पुस्तकात डोकावत होती. तिच्या या संशयास्पद हालचालींवर शाळेच्या शिक्षिका वनिता शेट्टी यांना संशय आल्याने त्यांनी त्या विद्यार्थिनीचा मोबाईल तपासला. त्यावेळी त्या विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपवर दहावीचा पेपर दिसून आला. हा पेपर तिने तिच्या इतर १५ मित्र-मैत्रिणींना पाठवला होता. याची माहिती शिक्षिका शेट्टी यांनी तातडीने शाळेच्या मुख्यध्यापकांच्या कानावर घातली. तूर्तास त्या विद्यार्थिनीला परीक्षेला बसू देत मुख्यध्यापकांनी साकीनाका पोलिसांना पाचरण केलं. परीक्षा झाल्यानंतर शेट्टी यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भा.दं.वि कलम ५, ६, ७, ८ आणि महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड तसेच इतर गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा १९८२ सब ६६(ड) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

पोलिस तपासात त्या मुलीला खैरानी रोडवरील तिच्या रन्स ट्युटोरिअल क्लासेसचे शिक्षक फिरोज यांनी हा पेपर पाठवल्याची कबुली तिने दिली. त्यानुसार पोलिसांनी फिरोज अन्सारीला अटक केली. फिरोजच्या चौकशीत त्याला हे पेपर मिरारोडचा ट्यूशन टीचर मुज्जमिल इक्बाल काझीने पाठवल्याचं सांगितल्यानंतर पोलिसांनी मुज्जमिलला अटक केली आहे. मुज्जमिलने हा पेपर कसा मिळवला याचा शोध साकीनाक पोलिस घेत आहेत.हेही वाचा

दहावी पेपरफुटी प्रकरण: चौथ्या आरोपीला अटक


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा