कंगनाला दिंडोशी न्यायालयाचा झटका, तर पडू शकतो घरावर हातोडा

अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut)ला दिंडोशी न्यायालयानं मोठा झटका दिला आहे. कंगनानं खार इथल्या घरात केलेल्या वाढीव बांधकामाला न्यायालयानं अनधिकृत असल्याचं सांगितलं आहे.

या आदेशाला आव्हान देण्यासाठी न्यायालयानं कंगनाला ६ आठवड्याची वेळ दिली आहे. त्यांनतर पालिका कंनानानं केलेलेल्या अनधिकृत बांधकामाची तोडफोड करु शकते.

खार पश्चिममधील डी. बी. ब्रिझ इमारतीत कंगनानं एकाच माळ्यावरील ३ फ्लॅट एकत्र केलेले आहेत. या बांधकामात तिनं मंजूर आराखड्याव्यतिरिक्त वाढीव जागा अतिक्रमीत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हा खटला दिंडोशी न्यायालयात सुरू होता. न्यायालयानं या खटल्यामध्ये कंगनानं केलेलं वाढीव बांधकाम अनधिकृत असल्याचा निकाल दिला आहे.

कंगनाचा खार पश्चिममधील डी. बी. ब्रिझ इमारतीत एक फ्लॅट आहे. या इमारतीतील एकाच माळ्यावरील तीन फ्लॅटला तिनं मर्ज करुन मंजूर आराखड्याव्यतिरिक्त जास्तीची जागा अतिक्रमित केली.

कंगनानं तिच्या घरात लॉबी, पॅसेज आणि कॉमन जागा एकमेकांत मर्ज केलेले आहेत. या एकत्रिकरणाचा उल्लेख या मंजूर आराखड्यात नाही. याबाबत पालिकेनं कंगनाला २०१८ मध्ये नोटीस पाठवली होती. हेच बांधकात अनधिकृत असल्याचं आता न्यायालयानं सांगितलं आहे.


हेही वाचा

ख्रिसमससाठी 'या' चित्रपट आणि सिरीजची खास मेजवानी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!' चित्रपटाचा मुहूर्त

पुढील बातमी
इतर बातम्या