Advertisement

ख्रिसमससाठी 'या' चित्रपट आणि सिरीजची खास मेजवानी

कोरोनामुळे ख्रिसमस घरातल्या घरातच साजरा करावा लागणार आहे. म्हणूनच नेटफ्लिक्सवर ख्रिसमसचे स्पेशल चित्रपट आणि सिरीज पाहता येणार आहेत.

SHARES
01/6
ख्रिसमससाठी 'या' चित्रपट आणि सिरीजची खास मेजवानी
हे फक्त कोणत्याही सुट्टीचे खास नाही, हे आहे हायस्कूल म्युझिकलः द म्युझिकल: द हॉलिडे स्पेशल! याचा नवा भाग ११ डिसेंबर रोजी डिस्ने प्लसवर प्रीमियर झाला. यामध्ये या ख्रिसमस सारख्या क्लासिक हॉलिडे ट्यून्स तसेच ब्रँड न्यू देखील देण्यात आल्या आहेत.
02/6
ख्रिसमससाठी 'या' चित्रपट आणि सिरीजची खास मेजवानी
“अ ख्रिसमस प्रिंस” हा चित्रपट नेटफ्लिक्सवर १७ नोव्हेंबर २०१७ रोजी रिलीज झाला होता. याचा सिक्वेल “अ ख्रिसमस प्रिन्स: द रॉयल वेडिंग” हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. याचा आणखी एक सिक्वेल “अ ख्रिसमस प्रिन्सः द रॉयल बेबी” २०१९ मध्ये प्रदर्शित झाला. हे तिन्ही चित्रपट तुम्ही कुटुंबियांसोबत बघू शकता.
03/6
ख्रिसमससाठी 'या' चित्रपट आणि सिरीजची खास मेजवानी
शुगर रशचा सीझन २ आता नेटफ्लिक्सवर दिसू शकेल. यात व्यावसायिक बेकर्सचे चार संघ १०,००० डॉलर्सचे बक्षीस मिळवण्यासाठी तीन वेगवेगळ्या स्थरांवर स्पर्धा करतील. ख्रिसमसच्या थीमवर स्पर्धेची आवाहनं देण्यात येतील.
04/6
ख्रिसमससाठी 'या' चित्रपट आणि सिरीजची खास मेजवानी
हा चित्रपट ख्रिसमस क्रॉनिकल्सचा सिक्वेल आहे. नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात किशोरवयीन केट तिच्या आईपासून दूर पळत आहे. कारण ती आईच्या नवीन नात्यावर नाराज आहे. ती तिच्या आईसोबत नॉर्थ पोलला राहायला जाते. जिथे ख्रिसमस रद्द करण्चा कट रचला जात आहे.
05/6
ख्रिसमससाठी 'या' चित्रपट आणि सिरीजची खास मेजवानी
नेटफ्लिक्सनं ख्रिसमस निमित्त आणखी एक मेजवांनी प्रक्षकांना दिली आहे. हा एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे. सर्वात महत्त्वाचं हा एक खऱ्या गोष्टीवर आधारीत चित्रपट आहे.
06/6
ख्रिसमससाठी 'या' चित्रपट आणि सिरीजची खास मेजवानी
लहान मुलांसाठी हा स्पेशल चित्रपट आहे. अनिमेटेड चित्रपट असल्यानं हा चित्रपट पाहताना लहान मुलांना नक्कीच मजा येणार आहे. ५ डिसेंबर रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा