दिलीप कुमार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना न्यूमोनिया झाला आहे. उपचारासाठी त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली.

दिलीप कुमार यांना काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं. न्यूमोनियामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या स्वास्थासाठी प्रार्थना करा, असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

छातीत इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना ५ नोव्हेंबरलाच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात जवळपास १४ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज दिल्यानंतरही दिलीप कुमार यांना जेवण आणि औषधं नळीवाटे दिली जात होती.


हेही वाचा-

तुम जियो हजारो साल...


पुढील बातमी
इतर बातम्या