बॉलिवूडमधील 'ही' अभिनेत्री साकारणार महिला क्रिकेटपटूची भूमिका?

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट बनले आहेत. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, धावपटू मिल्खासिंग आणि बॉक्सर मेरी कोम यांच्या सारख्या दिग्गज खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले. आता या चित्रपटांच्या यादीत आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.

अभिनेत्री आणि क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा बायोपिकच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. अनुष्का चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्याचं बोललं जातंय. यात झुलनची भूमिका अनुष्का साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यासंदर्भात अद्याप कुठली घोषणा करण्यात आली नाही आहे.  

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या गोलंदाजीचा कणा म्हणून झुलन गोस्वामीला ओळखलं जातं. सध्या झुलन गोस्वामी यांच्यासोबतचा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यात अनुष्कानं झुलन यांच्यासारखी हेअरस्टाईल केलीय. शिवाय तिनं भारतीय संघाचा पोषाख परिधान केला होता. तिच्यासोबत झुलन देखील दिसत आहेत. या फोटोमुळे ती झुलन यांची बायोपिक करतेय या चर्चा सुरू झाल्या. काही जणांनी ती चित्रपट नाही तर जाहीरात करतेय असं म्हटलं. तर काहींनी प्रोमो शूट करतेय असं म्हटलं. आता ती बायोपिक करतेय की नाही हे तर येणाऱ्या काळात कळेलच.  

अनुष्का शर्मा अखेरची झोरी या चित्रपटात झळकली होती. तिच्यासोबत या चित्रपटात शाहरुख खान आणि कतरिना कॅफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपली जादू दाखवू शकला नव्हता. तसंच प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाकडे पाठ फिरवली होती.


हेही वाचा

अक्षयचा नवा रेकॉर्ड, चित्रपटातून वर्षाला ७०० कोटींची कमाई

पुढील बातमी
इतर बातम्या