अक्षयचा नवा रेकॉर्ड, चित्रपटातून वर्षाला ७०० कोटींची कमाई

एका वर्षात बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींची कमाई करून अक्षयनं इतिहासच रचला आहे.

SHARE

वर्षाला जास्त चित्रपट करण्यात अभिनेता अक्षय कुमारचा कोणी हात धरू नाही शकत. वर्षाला ४-५ चिक्षपट अक्षय कुमार करतोच करतो. आता चित्रपट करण्यामध्येच नाही तर कमाईमध्ये देथील तो सर्वांहून वरचढ आहे. एका वर्षात बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींची कमाई करून अक्षयनं इतिहासच रचला आहे

अक्षयचा चौकार

अक्षयचा केसरी, मिशन मंगल, हाऊसफुल 4 आणि गुड न्यूज हे चार चित्रपट वर्ष २०१९ मध्ये प्रदर्शित झाले. या चारही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. अक्षय कुमारनं २०१९ मध्ये १५३ कोटींची कमाई केलेल्या, 'केसरी' चित्रपटापासून सुरुवात केली होती. त्यानंतर त्याचा दुसरा चित्रपट 'मिशन मंगल' होता. ज्यानं २०० कोटींची कमाई केली. हाऊसफुल 4 या तिसऱ्या चित्रपटानं २०६ कोटी रुपये कमावले. तर 'गुड न्यूज' चित्रपटानं आतापर्यंत १५० कोटींची कमाई केली आहे. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचतच आहे. अशा प्रकारे अक्षय कुमारच्या चित्रपटांनी कमाईबाबत ७०० कोटींचा आकडा गाठला आहे.


दुसऱ्या नंबरवर 'हा' अभिनेता

२०१९ मध्ये अक्षय कुमार नंतर, हृतिक रोशननं फिल्म वॉरमधून ३१७.९१ कोटी आणि सुपर ३० मधून १४६.९४ कोटी कमाई करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. टायगर श्रॉफ तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्यानं वॉरमधून ३१७.९१ आणि स्टुडंट ऑफ द इयर ६९.११ कोटी म्हणजे ३८७.०२ कोटी कमावले आहेत


वर्षाला सर्वाधिक कमाई करणारे ५ अभिनेता


अभिनेतावर्षचित्रपटांची संख्याकमाई
अक्षय कुमार २०१९४ चित्रपट७१९.४९ कोटी
हृतिक रोशन २०१९२ चित्रपट४६४.८५ कोटी
टायगर श्रॉफ२०१९२ चित्रपट३८७.०२
रणवीर सिंह २०१८२ चित्रपट५४२.४६ कोटी
प्रभास२०१७१ चित्रपट५१०.९९ कोटी
सलमान खान२०१५२ चित्रपट५३०.५० कोटीहेही वाचा

दीपिका पदुकोण सिद्धिविनायकच्या दरबारी

हिंसकपणे व्यक्त होणं चुकीचं, नागनाथ मंजुळेची पहिली प्रतिक्रिया

संबंधित विषय
ताज्या बातम्या