दीपिका पदुकोण सिद्धिविनायकच्या दरबारी

छपाक चित्रपट प्रदर्शित होताच दीपिका सिद्धिविनायक मंदिरात गजाननाच्या दर्शनाला गेली.

SHARE

दीपिका पदुकोणचा छपाक चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होताच दीपिका सिद्धिविनायक मंदिरात गजाननाच्या दर्शनाला गेली. दीपिका तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या क्षणी सिद्धिविनायक मंदिरात जाते. दीपिकानं क्रीम रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. ड्रेसला साजेसे कानातलेही तिनं घातले होते.

'छपाक' चित्रपटात दीपिकासोबत विक्रांत मेसी मुख्य भुमिकेत आहे. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा अॅसीड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. मेघना गुलझार यांनी दिग्दर्शन केलेला हा सिनेमा आज १० जानेवारीला प्रदर्शित झाला. याशिवाय आजच अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांचा 'तानाजी:द अनसंग वॉरीअर' सिनेमाही प्रदर्शित झाला

छपाक सिनेमा पाहिल्यानंतर रणवीरनं दिग्दर्शक आणि दीपिकाचं भरभरून कौतुक केलं. रणवीर म्हणाला की, 'मी तुझी मेहनत पाहिली आहे. तू या चित्रपटाचा आत्मा आहेस. हा तुझ्या आतापर्यंतच्या करिअरमधला सर्वात महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. असंच प्रामाणिकपणे काम करत रहा. मला तुझा अभिमान वाटतो. आय लव्ह यू.'  हेही वाचा

तुम्ही हिंसेला पाठिंबा देणार का? - सोनाक्षी सिन्हा

हिंसकपणे व्यक्त होणं चुकीचं, नागनाथ मंजुळेची पहिली प्रतिक्रिया

संबंधित विषय
ताज्या बातम्या