Advertisement

तुम्ही हिंसेला पाठिंबा देणार का? - सोनाक्षी सिन्हा

ट्वीटरवर #BoycotteChapak नावानं ट्रेंड सुरू झाला होता. पण चाहत्यांप्रमाणे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील दीपिकाच्या पाठिशी उभी राहिली आहे.

तुम्ही हिंसेला पाठिंबा देणार का? - सोनाक्षी सिन्हा
SHARES

जेएनयू प्रकरणात अनेक बॉलिवूड कलाकारांनी आवाज उठवला. अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, सोनम कपूर असा अनेक कलाकारांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. अभिनेत्री दीपिका पदुकोणनं देखील मंगळवारी जेएनयूत जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर दीपिकावर टीका करण्यात आली. ट्वीटरवर #BoycotteChapak नावानं ट्रेंड सुरू झाला. पण दीपिकाच्या चाहत्यांप्रमाणे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील दीपिकाच्या पाठिशी उभी राहिली आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं याप्रकरणी ट्विट केलं आहे. सोनाक्षी ट्विटमध्ये लिहिते की, 'तुम्ही कोणत्याही पक्षाचे का असेनात, कोणत्याही पक्षाला पाठिंबा देत असाल, पण तुम्ही हिंसेला पाठिंबा देणार का? रक्तानं माखलेले विद्यार्थी आणि शिक्षक पाहून तुमचा थरकाप उडाला नाही? आता आपण हातावर हात ठेवून बसू शकत नाही. दीपिकाचं तिथं जाणं आणि अन्य लोकांचं आवाज उठवणं प्रशंसनीय आहे. ही गप्प बसण्याची वेळ नाही.'

रविवारी सायंकाळी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी-शिक्षकांवर काही अज्ञात गुंडांनी हल्ला केला. संकुलातील मालमत्तेचंही नुकसान केलं. यानंतर देशभर या घटनेचे पडसाद उमटले. मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध केलाहेही वाचा

दीपिका पदुकोणच्या 'छपाक'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

आरारारारा...खतरनाक ट्रोल झाले प्रविण तरडे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा