Advertisement

दीपिका पदुकोणच्या 'छपाक'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

'छपाक' चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी मुंबई हायकोर्टात याचिकेद्वारे करण्यात आली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.

दीपिका पदुकोणच्या 'छपाक'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
SHARES

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या छपाक चित्रपटाच्या प्रदर्शनावरील स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे छपाक चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. कॉपीराईटचा मुद्दा उपस्थित करत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी मुंबई हायकोर्टात याचिकेद्वारे करण्यात आली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.

 राकेश भारती यांनी छपाकच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी केली होती. त्यावर "सत्यघटनेवर आधारित चित्रपटाच्या कथेवर कॉपीराईट कसा होऊ शकतो?", असा प्रश्न मुंबई हायकोर्टानं उपस्थित केला. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी स्थगितीची मागणी मागे घेतली. कथेतील इतर घटनांशी साधर्म्य आढळल्यास कोर्टात दाद मागण्याचा पर्याय हायकोर्टानं याचिकाकर्त्यांसाठी खुला ठेवला आहे.


मंगळवारी दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. कायद्यानुसार, सत्यघटनेवर आधारित चित्रपटाच्या कथेवर कॉपीराइटचा दावा केला जाऊ शकत नाही. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावण्यात यावी, अशी विनंती गुलजार यांनी केली होती. प्रसिद्धी मिळवण्यासाठी, तसंच चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा निर्माण करण्याच्या हेतूनं किंवा त्यात विलंब करण्याच्या उद्देशानं ही याचिका दाखल करण्यात आली आहे, असा दावा त्यांनी केला होता.



हेही वाचा

आरारारारा...खतरनाक ट्रोल झाले प्रविण तरडे

नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू : तनुश्री दत्ता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा