Advertisement

नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू : तनुश्री दत्ता

नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू अशा शब्दांत अभिनेत्री तनुश्री दत्तानं टीका केली आहे.

नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू : तनुश्री दत्ता
SHARES

अभिनेत्री तनुश्री दत्तानं पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावर टीका केली आहे. फक्त नाना पाटेकरच नाही तर कोरिओग्राफर गणेश आचार्यवर देखील तिनं आरोप केला आहे. नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू अशा शब्दांत अभिनेत्री तनुश्री दत्तानं आगपाखडकेली आहे. याप्रकरणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तिनं हे वक्तव्य केलं आहे.

नाना पाटेकर यांचे वकील निलेश पावसकर यांनी सर्व पुरावे नष्ट केले आहेत. त्यांनी २००५ सालापासून नाना पाटेकर यांच्यावरील अनेक लैंगिक शोषणाची प्रकरणे रद्द केली आहेत. नाना पाटेकर यांनी त्यावेळी मनसेच्या गुंडांना बोलावून सेटवर गोंधळ घातला होता. त्यानंतर कोरिओग्राफर गणेश आचार्यनं माझं करिअर उध्वस्त केलं,” असे आरोप तनुश्रीनं केले आहेत.


पत्रकार परिषदेत तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनवरही गंभीर आरोप केले. “नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या नावावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. त्यांनी या संस्थेच्या नावाचा वापर करून परदेशातून कोट्यवधींच्या देणग्या घेतल्या. हा पैसा कुठे जातो? गरीबांना वर्षातून एकदा साड्या वाटायच्या आणि फोटो काढायचा की यांचं काम झालं. ते कोल्हापूर पूरग्रस्तांना ५०० घरं देणार होते, त्याचं काय झालं? हे कोणी जाऊन बघितलं?”, असे अनेक प्रश्न तिनं उपस्थित केले.हेही वाचा

काश्मिरी पंडितांवरील अत्याचार मांडणारा 'शिकारा'

अक्षय कुमारविरोधात पोलिसात तक्रार दाखलRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा