Advertisement

काश्मिरी पंडितांवरील अत्याचार मांडणारा 'शिकारा'

काश्मीर खोऱ्यात पसरलेला हिंसाचार यावर कथा अधोरेखित करण्यात आली आहे.

काश्मिरी पंडितांवरील अत्याचार मांडणारा 'शिकारा'
SHARES

काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार आता ३० वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. विधू विनोद चोप्रा यांच्या ‘शिकारा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. १९ जानेवारी १९९० हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस होता. कारण त्या दिवशी जवळपास ४ लाख काश्मिरी पंडितांना खोरं सोडून बाहेर जावं लागलं आणि आपल्याच देशात शरणार्थी होऊन जगावं लागलं

जवळपास अडीच मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये भावनांच्या चढउतारांमधून जाणारी प्रेमकथा आणि त्यादरम्यान काश्मीर खोऱ्यात पसरलेला हिंसाचार यावर कथा अधोरेखित करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आदिल खान आणि सादिया हे दोघं कलाविश्वात पदार्पण करत आहेत. शिवकुमार आणि शांती या दोन भूमिका हे दोघं साकारत आहेत.

नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात विधू विनोद चोप्रा म्हणाले, आज होत असलेल्या आणि ३० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये झालेल्या सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा मी निषेध करतो.”  सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा

अक्षय कुमारविरोधात पोलिसात तक्रार दाखल

आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनीचा मॅडनेस ड्रामा 'मलंग'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा