Advertisement

आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनीचा मॅडनेस ड्रामा 'मलंग'

दिशा आणि आदित्यसह या चित्रपटात कुणाल खेमू आणि अनिल कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनीचा मॅडनेस ड्रामा 'मलंग'
SHARES

आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनी स्टारर मलंग चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ही जोडी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत असल्यानं त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दिशा आणि आदित्यसह या चित्रपटात कुणाल खेमू आणि अनिल कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

मोहित सुरी दिग्दर्शित मलग चित्रपटाचा ट्रेलर २ मिनिटं ४५ सेकंदांचा आहे. चित्रपटातील चारही व्यक्तिरेखांमध्ये एका गोष्टीमध्ये साम्य दिसून येतंय. ते म्हणजे चौघांनाही प्राण घ्यायला आवडतात. आता कोण कोणाचे प्राण घेतो? हे आपल्याला चित्रपट रिलीज झाल्यानतंरच कळेल.

दिशा आणि आदित्यच्या केमिस्ट्रीवर चित्रपटात भर देण्यात आला आहे. चित्रपटात लव्ह सिक्वेन्ससह अॅक्शनचाही भडीमार आहे. ट्रेलरमध्ये अनिल कपूर चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असल्याचे स्पष्ट कळते. पण दिशा, आदित्य आणि कुणालच्या भूमिकेचा खुलासा करण्यात आला नाही.

लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी मिळून मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यासोबत गुलशन कुमार आणि टी-सीरिजनं चित्रपटाची निर्मिती केली आहे. असिम अरोडानं ही थ्रिलिंग लव्ह स्टोरी लिहिली असून हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे


काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते. यातील एका पोस्टरमध्ये दिशा पाटनी, आदित्य कपूरच्या खांद्यावर बसून लिपलॉक करताना दिसत होती. सोशल मीडियावर चित्रपटाचे हे पोस्टर तुफान व्हायरल झाले होते.



हेही वाचा

सारा अली खानचा बिकनी अवतार पाहिलात का?

भाजप, अभाविपमुळेच जेएनयूत हिंसा, अनुराग कश्यपचा थेट आरोप

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा