Advertisement

भाजप, अभाविपमुळेच जेएनयूत हिंसा, अनुराग कश्यपचा थेट आरोप

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री झालेली हिंसा भाजप आणि अभाविपने घडवून आणली असून त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा असल्याचं म्हणत प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने दोघांवर थेट निशाणा साधला आहे.

भाजप, अभाविपमुळेच जेएनयूत हिंसा, अनुराग कश्यपचा थेट आरोप
SHARES

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री झालेली हिंसा भाजप आणि अभाविपने घडवून आणली असून त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा असल्याचं म्हणत प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने दोघांवर थेट निशाणा साधला आहे.

जेएनयूतील हिंसाचाराचे देशभरात पडसाद उमटले असून जागोजागी विद्यार्थी या हल्ल्याचा निषेध करत आहेत. बाॅलिवूडमधूनही अनेक कलाकारांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. त्यात स्वरा भास्कर, राजकुमार राव, तापसी पन्नू, दीया मिर्जी आणि रितेश देशमुख इ. कलाकारांचा समावेश आहे. अनुराग कश्यप आपल्या फटकळ बोलण्यासाठी परिचित आहे. याआधीही भाजप किंवा केंद्र सरकारच्या धोरणांवर थेट टीका केल्यामुळे त्याने अनेकदा वाद ओढावून घेतले आहेत.

हेही वाचा- जेएनयूतील हल्ला बघून २६/११ ची आठवण झाली- उद्धव ठाकरे

त्यानुसार जेएनयू प्रकरणातही त्याने ट्विटरवरून आपली भूमिका स्पष्ट करत थेट. मोदी आणि शहा यांच्यावर हल्ला चढवला. ट्विटरवर लिहिलेल्या पोस्टमध्ये अनुराग म्हणतो की, 'आता भाजप निंदा करणार. ज्यांनी केलं ते चुकीचं होतं असं ते म्हणणार, पण, सत्य हेच आहे की, जे काही झालं ते भाजप आणि अभाविपने केलं आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सांगण्यावरून झालं. हेच एकमेव सत्य आहे.'

काही बुरखाधारी अज्ञात व्यक्तींना जेएनयूत विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. अनुरागने आपल्या ट्विटवर मोदी आणि शहा यांचे तोंडाला रुमाल लावलेले फोटोही प्रोफाइल फोटो म्हणून लावले आहेत. यावरून त्याला मोदी आणि शहा समर्थकांकडून चांगलंच ट्रोल केलं जात आहे. 

हेही वाचा- जेएनयू हल्ला: गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडही आंदोलनात सहभागी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा