Advertisement

अक्षय कुमारविरोधात पोलिसात तक्रार दाखल

अक्षय कुमारनं निरमाची ही जाहिरात करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप आता त्याच्यावर होत आहे.

अक्षय कुमारविरोधात पोलिसात तक्रार दाखल
SHARES

अभिनेता अक्षय कुमार हा निरमा पावडरच्या एका जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अक्षय कुमारनं निरमाची ही जाहिरात करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप आता त्याच्यावर होत आहे. याप्रकरणी वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


सुर्यकांत जगन्नाथ जाधव यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. यात म्हटलं आहे की, जाहीरात बनवणाऱ्या कंपनीवर आणि या जाहिरातीत काम करणाऱ्या कलाकारावर कारवाई करावी, अशी मागणी यात करण्यात आली आहे. 

अक्षय कुमार आणि इतर कलाकारांना निरमाच्या जाहिरातीत मावळ्यांच्या वेशात दाखवण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा या जाहिरातीमधून अपमान करण्यात येत असून अभिनेता अक्षय कुमारनं याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत.अक्षय कुमार आणि इतर मावळे निरमा पावडरच्या या जाहिरातीत लढाई करुन दरबारात परतलेले असतात. त्यावेळी सुवासिनी त्यांचं औक्षण करतात. पण एक महिला त्यांचे युद्धात मळलेल्या, खराब झालेल्या कपड्यांवर भाष्य करते आणि हे कपडे तर आम्हालाच धुवावे लागतील असं म्हणते.

अक्षय कुमार ज्यानंतर म्हणतो, महाराज की सेना दुश्मनोंको धोना जानती हैं और अपने कपडे भी! आणि त्यानंतर अक्षय कुमार आणि त्याच्यासह सगळे मावळे कपडे धुताना दाखवण्यात आले आहेत. पण हा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा असून याप्रकरणी अक्षय कुमारनं माफी मागावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. पण अक्षयनं यासंदर्भात अजून कुठलंच वक्तव्य केलं नाही.


हेही वाचा

भाजप, अभाविपमुळेच जेएनयूत हिंसा, अनुराग कश्यपचा थेट आरोप

आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनीचा मॅडनेस ड्रामा 'मलंग'


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement