Advertisement

आरारारारा...खतरनाक ट्रोल झाले प्रविण तरडे

मुळशी पॅटर्न फेम अभिनेता प्रविण तरडे एका कमेंटमुळे चांगलेच ट्रोल झाले आहेत. वाचा काय बोलले ते जेएनयूच्या मुद्द्यावर...

आरारारारा...खतरनाक ट्रोल झाले प्रविण तरडे
SHARES

जेएनयू हल्ल्याचा निषेध नोंदवत देशभर ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. तर सिनेसृष्टीत यावरुन दोन गट पडले आहेत. जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक कलाकार मैदानात उतरले आहेत. त्यात मुळशी पॅटर्न फेम अभिनेता प्रविण तरडे यांची देखील भर पडली आहे. पण प्रविण तरडे यांना भाजपाच्या समर्थनार्थ वक्तव्य करण चांगलंच महागात पडलं आहे. भाजपच्या बाजूनं कमेंट केल्यानं नेटिझन्सनी त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.


पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहीली होती. 'एकतर तुम्ही देशासोबत आहात किंवा तुम्ही भाजपासोबत आहात. ठरवा', असं त्यांनी फेसबुकवर पोस्ट केलं होतं. परुळेकरांच्या या पोस्टवर अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रविण तरडे यांनी 'संपूर्ण देश भाजपासोबत आहे', अशी कमेंट केलीया कमेंटवर नेटिझन्सकडून टीकांचा भडीमार सुरू झाला. तरडेंच्या कमेंटवर आतापर्यंत जवळपास २ हजाराहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. यात तरडेंच्या पोस्टचा विरोध करणाऱ्या अधिक प्रतिक्रिया आहेत.




हेही वाचा

भाजप, अभाविपमुळेच जेएनयूत हिंसा, अनुराग कश्यपचा थेट आरोप

काश्मिरी पंडितांवरील अत्याचार मांडणारा 'शिकारा'

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा