Advertisement

हिंसकपणे व्यक्त होणं चुकीचं, नागनाथ मंजुळेची पहिली प्रतिक्रिया

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचारावर कलाक्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटत असताना प्रसिद्ध दिग्दर्शक नागनाथ मंजुळे पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत.

हिंसकपणे व्यक्त होणं चुकीचं, नागनाथ मंजुळेची पहिली प्रतिक्रिया
SHARES

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचारावर कलाक्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटत असताना प्रसिद्ध दिग्दर्शक नागनाथ मंजुळे पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत. प्रत्येकाला घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. परंतु त्याचा गैरफायदा घेत हिंसकपणे व्यक्त होणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले.  

हेही वाचा- तुम्ही हिंसेला पाठिंबा देणार का? सोनाक्षी सिन्हा  

‘शोध मराठी मनाचा २०२०’ या संमेलनाची गुरूवारी अलिबागमध्ये सांगता झाली. यावेळी जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी नागनाथ मंजुळे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत देशात सुरू असलेल्या सद्यस्थितीवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 

जातीपातीची मानसिकता घालवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. परंतु जात ही अजगरासारखी आहे. कितीही प्रयत्न करूनही जातीचं राजकारण अधिकच घट्ट होत चाललं आहे. घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. परंतु या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत समाजमाध्यमांवर उमटणाऱ्या प्रतिक्रिया खूपच घातक आहेत. अशा प्रकारे हिंसकपणे व्यक्त होणं चुकीचं आहे.

या कार्यक्रमाला माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी नेते गिरीश गांधी, माजी आमदार मीनाक्षी पाटील, अमेरिकेतील बृहन्मराठी मंडळाच्या अध्यक्षा विद्या जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, चित्रपट निर्माते मेघराज भोसले, स्वागताध्यक्ष चित्रलेखा पाटील, ज्येष्ठ पत्रकार डाॅ. विजय चोरमारे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा- अभिनेत्रींनी मुंबईतच राहून नाचावं, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा